Pune News : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला असून राज्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस, भाजप, अजित पवार गटानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार जाहीर केले. रविवारी (ता. २७) याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घोषणा केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली असून आता ९ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आतापर्यंत ७६ उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून पहिल्या यादीत ४५ जणांचा समावेश होता. यानंतर दुसऱ्या यादीतून २२ उमेदवार देण्यात आले. या दोन्ही यादीत कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात म्हणजेच परळीचा उमेदवार कोण याकडे राज्याचे लक्ष लागले होते. मुंडे यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
यादरम्यान रविवारी तिसऱ्या यादीतून बीडमधील परळी मतदारसंघात धनंजय मुडेंच्या विरोधात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे शरद पवार गटाने मुंडे यांच्या पराभवासाठी कंबर कसली असून सर्व ताकद देशमुख यांच्या मागे उभारली जाणार असे संकेत दिले आहेत. तर शरद पवार यांनी उमेदवार दिल्यानंतर मुंडे यांनी, आपण जाती-पातीचे राजकारण करणारे नसून मायबाप जनतेच्या प्रेमावर निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. निवडणुकीचा फैसला जनता करेल. त्यामुळे कोण कोणता उमेदवार देतो याकडे गांभिर्याने पाहत नसल्याचे म्हटले आहे.
शरद पवार गटाचे उमेदवार
राजेसाहेब देशमुख (परळी), ज्ञायक पाटणी (वाशिम कारंजा), राहुल कलाटे (चिंचवड), मोहन जगताप (माजलगाव), रमेश बंग (हिंगणा), फहद अहमद (अणुशक्तीनगर), सिद्धी कदम (मोहोळ), अजित गव्हाणे (भोसरी), अतुल वांदिले (हिंगणघाट)
शरद पवार गटाकडून लाडक्या बहिणींचा सन्मान
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तिसऱ्या यादीची घोषणा करताना सिद्धी कदम यांच्याबद्दल माहिती दिली. कदम यांनी टाटा इन्स्टिट्यूटमधील पोस्ट ग्रॅड्युऐशन केले आहे. त्या अत्यंत सुशिक्षित मुलगी असून गेल्या दोन वर्षांपासून एनजीओमध्ये काम करत असल्याचे म्हटले आहे. तर शरद पवार यांच्या नेतृत्वात आम्ही फक्त लाडक्या बहिणींच्या बाता करत नाही. तर त्यांचा सन्मान करतो, आम्ही आतापर्यंत ११ महिलांची उमेदवारी जाहीर केली असे जयंत पाटील यांनी सांगितले.
महाविकासआघाडीचा लेखाजोखा
महाविकासआघाडीकडून आतापर्यंत २३९ उमेदवार जाहीर केले आहेत. यात काँग्रेसचे ८७, उद्धव ठाकरे यांची शिवसेना ८५ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत ७६ उमेदवार जाहीर केले आहेत. आता ४९ उमेदवार अद्याप घोषित करण्यात आले नसून ते देखील आज सायंकाळ किंवा सोमवारी (ता.२८) घोषित केले जातील असेही जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.