BJP And Sharad Pawar NCP 2nd Candidate List : शरद पवार गटाच्या पाठोपाठ भाजपने देखील जाहीर केली उमेदवारांची दुसरी यादी

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभेचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करत आहेत. काँग्रेसने २३ उमेदवारांची दुसरी यादी शनिवारी जाहीर केल्याबरोबर भाजप आणि शरद पवार गटाने देखील दुसरी यादी जाहीर केली.
Vidhansabha Election
Vidhansabha Election Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला रंग चढत आहे. शनिवारी (ता.२६) काँग्रेसने आपल्या २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कोणाला उमेदवारी देणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. यानंतर दुपारनंतर शरद पवार गटाने दुसरी यादी जाहीर केली. त्यापाठोपाठ भाजपने देखील दुसरी यादी जाहीर करत आपण महायुतीत बॉस असल्याचे दाखवून दिले आहे. दुसऱ्या यादीनंतर भाजपचे १२१ उमेदवार रिंगणात असल्याचे समोर आले आहे.

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेत दुसरी यादी जाहीर केली. पाटील यांनी एकूण २२ उमेदवारांची यादी जाहीर केली. याआधी शरद पवार गटाने आपल्या ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आता दुसऱ्या यादीनंतर शरद पवार गटाने ६७ उमेदवार जाहीर केले आहेत.

Vidhansabha Election
BJP Candidate List : महायुतीच्या जागा वाटपाच्या रस्सीखेचात भाजपची बाजी; उमेदवारांची पहिली यादी जाहीर

शरद पवार गटाचे उमेदवार

मदन कारंडे (इचलकरंजी), (चंदगड) नंदिनीताई भाबुळकर कुपेकर, सतीश अण्णा पाटील (एरंडोल), सतीश चव्हाण (गंगापूर), पांडुरंग बरोराम (शहापूर), राहुल मोटे (परांडा), संदीप क्षीरसागर (बीड), मयुरा काळे (आर्वी), दीपिका चव्हाण (बागलान), माणिकराव शिंदे (येवला), उदय सांगळे (सिन्नर), सुनीता चारोस्कर (दिंडोरी), पूर्व गणेश गीते (नाशिक), ओमी कलानी (उल्हासनगर), सत्यशील शेरकर (जुन्नर), सुलक्षणा शीलवंत (पिंपरी), अश्विनीताई कदम (पर्वती), अमित भांगरे (अकोले) अभिषेक कळमकर (अहिल्या नगर शहर) उत्तमराव जानकर (माळशिरस), दीपक चव्हाण (फलटण) आणि खडकवासला मतदारसंघातून सचिन दोडके दिली आहे.

Vidhansabha Election
Maharashtra Assembly Election : काँग्रेसने जाहीर केली दुसरी यादी; २३ जागांवर कोणाला लॉट्री?

दरम्यान भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली. भाजपने दुसरी यादी जाहीर करत यावेळी २२ जणांना उमेदवारी दिली आहे. यामुळे आतापर्यंत भाजपने १२१ उमेदवार जाहीर केले आहेत. तर आतापर्यंत जाहीर झालेल्या यादीवरून भाजपने अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट दिल्याचे दिसत आहे.

भाजपची दुसरी यादी

राम भदाणे (धुळे ग्रामीण), प्रकाश भारसाकले (अकोट), सत्याजित देशमुख (शिराळा), देवेंद्र कोटे (सोलापूर मध्य), रमेश कराड (लातूर ग्रामीण), हरिश्चंद्र भोये (विक्रमगड), करण देवतळे (वरोरा), हेमंत रासने (कसबा), कृष्णालाल सहारे (ब्रह्मपुरी), देवराव भोंगळे (राजुरा), डॉ. मिलिंद नरोटे (गडचिरोली), केवलराम काळे (मेळघाट) आणि अकोला पश्चिममधून विजय अग्रवाल यांना भाजने उमेदवारी दिली आहे. तर जत मतदार संघातून विद्यमान विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ भाजपने टाकली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com