Dr. Pramod Savant Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Farming : जमिनीच्या उत्तम आरोग्यासाठी नैसर्गिक, सेंद्रिय शेती गरजेची

Dr. Pramod Sawant : जमिनीच्या उत्तम आरोग्यासाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती गरजेची असल्याचे मत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Sindhudurg News : भरघोस आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी जमिनीचे आरोग्य महत्त्वाचे आहे. जमिनीच्या उत्तम आरोग्यासाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती गरजेची असल्याचे मत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

किर्लोस कृषी विज्ञान केंद्र आणि छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, ओरोसच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ओरोस येथे तीन दिवसीय आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने नैसर्गिक शेती, आंबा, काजू मोहर संरक्षण, वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण व बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, उपाध्यक्ष प्रदीप सावंत, शास्त्रज्ञ डॉ. आनंद हनुमंते, शास्त्रज्ञ डॉ. विजय देसाई, नागेश दप्तदार, डॉ. अजय राणे आदी उपस्थित होते.

डॉ. सावंत म्हणाले, की उत्तम शेतीसाठी जमिनीचे आरोग्य संतुलित राखणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे भविष्यात नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यात यावे जेणेकरून रासायनिक अवशेष मुक्त अन्न व आरोग्य सुरक्षा देता येतील. नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन खर्चात बचत होते. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बचत होऊन निव्वळ नफा वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकाधिक क्षेत्र नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती करावी, असे आवाहनदेखील केले.

‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक भाग्यश्री नाईकनवरे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ बाळकृष्ण गावडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर, डॉ. विलास सावंत, विकास धामापुरकर, डॉ. केशव देसाई, विवेक सावंत-भोसले, सुमेधा तावडे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश परुळेकर, प्राध्यापक, शेतकरी, महिला व विद्यार्थी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Season 2024 : दामाजी, विठ्ठलराव शिंदे कारखान्यांचा वाहतूक खर्च कमी

Latur Voting Percentage : वाढलेल्या मताच्या टक्क्याचा कोणाला बसणार?

Nashik Assembly Voting : नाशिक जिल्ह्यात सरासरी ६७.९७ टक्के मतदान

Agriculture Irrigation : सिंचन योजनेतून शेतीसाठी २१ टीएमसी पाणी

GM Mustard : जीएमला परवानगी दिली तर तेलबिया उत्पादन वाढेल; जीएमला परवानगी देण्याची उद्योगांची मागणी

SCROLL FOR NEXT