Organic Farming : पुणे जिल्ह्यात सेंद्रिय शेतीला सुरुवात

Team Agrowon

पुणे जिल्ह्यात ‘डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान’ २१० गावांमध्ये सुरू आहे.

Organic Farming | Agrowon

आतापर्यंत ६ हजार ७५६ शेतकरी या अभियानामध्ये सहभागी झाले आहेत. तर ६ हजार ८०० हेक्टर क्षेत्राची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे.

Organic Farming

विषमुक्त अन्न, प्रदूषण विरहित जमीन व पाणी आणि एकूणच शाश्वत कृषी उत्पादनासाठी नैसर्गिक, सेंद्रिय शेतीला कृषी विभागाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे.

Organic Farming

रासायनिक खतांचा अतिवापर, पिकांचे अवशेष जाळणे, पिकांची योग्य फेरपालट न करणे,

Organic Farming

मशागतीच्या अयोग्य पद्धती, गाई-म्हशींचे घटते प्रमाण आणि शेणखताचा कमी वापर आदींमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणात लक्षणीय घट होत असल्याचे कृषी तज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे.

Organic Farming | Agrowon

शेत जमिनींमध्ये सर्वसाधारणपणे ०.४० टक्केपेक्षा कमी सेंद्रिय कर्ब आढळून आले आहे. रसायनांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीचा पोत खालावलेला आहे.

क्लिक करा