Natural Farming Training Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Training : कृषी विज्ञान केंद्रात नैसर्गिक शेती प्रशिक्षण

Natural Farming Training : मानव, पशुपक्षी, जमीन अर्थातच जीवसृष्टीच्या निकोप आरोग्यासाठी व शाश्वत विकासासाठी नैसर्गिक शेती अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत शेतकरी व अधिकाऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले.

Team Agrowon

Jalgaon News : डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत नैसर्गिक शेतीविषयी दोन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण ममुराबाद (ता.जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्रात नुकतेच झाले.

मानव, पशुपक्षी, जमीन अर्थातच जीवसृष्टीच्या निकोप आरोग्यासाठी व शाश्वत विकासासाठी नैसर्गिक शेती अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत शेतकरी व अधिकाऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले.

यानिमित्त झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. हेमंत बाहेती होते. प्रमुख अतिथी आत्माचे प्रकल्प संचालक, रविशंकर चलवदे, तसेच प्रकल्प उपसंचालक पांडुरंग साळवे हे होते.

श्री. चलवदे यांनी नैसर्गिक शेती अभियानात शेतकऱ्यांनी अधिक सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. तसेच नैसर्गिक शेतीबद्दलचे समज व गैरसमज याविषयी मार्गदर्शन केले. प्रकल्प उपसंचालक साळवे यांनी या अभियानातील तांत्रिक बाबी, शेतकरी गटांना असलेल्या तरतुदी व निकष याविषयी मार्गदर्शन केले.

भरतसिंह राजपूत यांनी सेंद्रिय निविष्ठा निर्मिती कशा कराव्यात, त्यासाठी लागणारे पदार्थ व वापर पद्धती याविषयी मार्गदर्शन केले. विषय विशेषज्ञ डॉ. शरद जाधव यांनी सेंद्रिय शेती म्हणजे काय, सेंद्रिय शेतीचे महत्त्व याविषयी सांगितले.

विषय विशेषज्ञ तुषार गोरे यांनी सेंद्रिय निविष्ठांचे प्रमाणीकरण व ब्रॅण्डिंग याविषयी मार्गदर्शन केले. मयुरी देशमुख यांनी माती पाणी परीक्षण, पीएम प्रणाम योजना याविषयी माहिती दिली. प्रक्षेत्र भेट व प्रात्यक्षिक सत्रामध्ये डॉ. जाधव यांनी जीवामृत, बिजामृत, अमृतपाणी, ह्युमिक ॲसिड निर्मिती प्रात्यक्षिके करून दाखवली. सूत्रसंचालन विषय विशेषज्ञ वैभव सूर्यवंशी यांनी केले. आभार अक्षय पाटील यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT