Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Highway And Agriculture : राष्ट्रीय महामार्ग अन् शेती

एका गावात दिनकर नावाचा एक माणूस राहत होता, तो आपला उदरनिर्वाह स्वतःची शेती कसून करत होता. दिनकरने फार वर्षांपूर्वी पाच एकर जमीन खरेदी केली होती. ही खरेदीची जमीन राष्ट्रीय महामार्गाला (हाय-वे) लागून असल्यामुळे दिनकरच्या जमिनीचा बाजारभाव जास्त होता.

Team Agrowon

एका गावात दिनकर नावाचा एक माणूस राहत होता, तो आपला उदरनिर्वाह स्वतःची शेती (Agriculture) कसून करत होता. दिनकरने फार वर्षांपूर्वी पाच एकर जमीन (Agriculture Land) खरेदी केली होती.

ही खरेदीची जमीन राष्ट्रीय महामार्गाला (National Highway) (हाय-वे) लागून असल्यामुळे दिनकरच्या जमिनीचा बाजारभाव जास्त होता.

एक दिवस एका वृत्तपत्रात छोटी बातमी छापून आली, की सरकारने महामार्गाचे रुंदीकरण करून रस्ता सहा पदरी करण्याचे ठरविले आहे. याची माहिती दिनकरला गावातल्या एका माणसाने सांगितली.

त्यानंतर दिनकरने फार विचार केला. गावातल्या इतर शेतकऱ्यांशी चर्चा केली. सर्व शेतकऱ्यांना जमीन रस्त्यासाठी संपादित होऊ नये, असे वाटत होते. दिनकरला वाटले, की आता आपली जमीन हायवेच्या रुंदीकरणामध्ये जाईल.

त्यामुळे त्याने ती जमीन विकण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे त्याने ती जमीन जास्त भावाने जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याला विकून टाकली. त्या व्यापाऱ्याला त्या जागेवर एक मोठे हॉटेल बांधावयाचे होते.

काही दिवसांनंतर त्याची काही जमीन राष्ट्रीय महामर्ग रुंदीकरणामध्ये गेली. त्याला वाटले, की आता राहिलेल्या जमिनीत आपले हॉटेल होईल म्हणून त्याने हॉटेलसाठी सरकारला परवानगी मागितली.

पण ती जमीन ‘नॅशनल हायवे’च्या ७५ मीटर अंतराच्या आत येत असल्यामुळे त्याला तिथे कोणतेच बांधकाम करता येत नाही असे नगररचना विभाग कार्यालयाने त्याला लेखी उत्तर दिले. ते उत्तर मिळाल्यावर तो हतबल झाला. ज्या कामासाठी जमीन खरेदी केली ते काम काही होत नाही, हे जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा फार उशीर झाला होता.

एवढी महागडी जमीन आपल्या गळ्यात पडली, पण ती सुद्धा रस्ता रुंदीकरणात गेली. आता नियमानुसार त्याला हॉटेलपण बांधता येईना अशी त्याची विचित्र अवस्था झाली होती.

थोडक्यात, या प्रकरणात हायवेच्या रुंदीकरणात जमीन जाणार असताना जमीन विक्री केली गेली. राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यापासून ७५ मीटर बांधकाम रेषेत कोणतेही बांधकाम करता येत नाही. शिवाय जी गोष्ट शेतकऱ्याला माहिती होती ती शिकलेल्या व्यापाऱ्याला नाही समजली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT