National Farmer's Day Agrowon
ॲग्रो विशेष

National Farmer's Day 2023 : देशाचे पंतप्रधान तरीही शेतकऱ्यांचे कैवारी ; कोण होते चौधरी चरणसिंह?

Indian Farmer : भारतीय अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळेच शेतीला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हटले जाते.

Mahesh Gaikwad

Indian Agriculture : भारतीय अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळेच शेतीला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हटले जाते. देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्यात मोलाचं योगदान देणाऱ्या शेतकऱ्याला 'जगाचा पोशिंदा' म्हणतात.

शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २३ डिसेंबर हा दिवस संपूर्ण देशात 'राष्ट्रीय शेतकरी दिन' म्हणून साजरा केला जातो. देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांच्या जयंतीनिमित्त आजचा दिवशी शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो.

देशात शेतकऱ्यांचा आवाज उठवणारे अनेक नेते झाले. पण देशाचे पंतप्रधानपद भूषवलेल्या चौधरी चरणसिंह यांना शेतकरी खऱ्या अर्थाने आपला कैवारी मानतात. त्यामुळेच आजचा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो.

शेतकरी दिन आजच का साजरा करतात?

देशाचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी दिन साजरा केला जातो. चौधरी चरणसिंह यांचा जन्म २३ डिसेंबर १९०२ मध्ये उत्तरप्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील नूरपुर या गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.

१९७९ ते १९८० दरम्यान त्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषविले. पंतप्रधानपदाच्या आपल्या छोट्या कार्यकाळात त्यांनी शेती क्षेत्रातील सुधारणांच्या धोरणांमध्ये मोठे योगदान दिले. त्यामुळे चौधरी चरणसिंह यांचा जन्मदिन राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून देशभर साजरा केला जातो.

शेतकऱ्यांचे कैवारी अशी ओळख

देशाचे पंतप्रधान म्हणून आपल्या अल्प कार्यकाळामध्ये चौधरी चरणसिंह यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. शेतकऱ्यांना खासगी सावकारांच्या अत्याचारापासून दिलासा देण्यासाठी १९३९ मध्ये कर्जमुक्ती विधेयकाचा मसुदा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. देशातील पहिल्या मुख्यमंत्री सुचेता कृपलानी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कृषी आणि वनमंत्री म्हणूनही काम पाहिले.

देशातील शेती आणि शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी चौधरी चरणसिंह यांनी विशेष प्रयत्न केले. परिणामी, २००१ साली तत्कालीन सरकारने चौधरी चरणसिंह यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT