Grape Export Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Export : नाशिकच्या पूर्वहंगामी द्राक्षांची रशियाला निर्यात

Grape Market : काढणीपश्‍चात या द्राक्षांची निर्यात सुरू झाली असून पहिले दोन कंटेनर रशियासाठी रवाना झाले आहेत.

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील कसमादे भागात द्राक्ष उत्पादक गेल्या दोन दशकांपासून जोखीम घेऊन पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादन घेत आहेत. यंदाच्या हंगामात द्राक्षमालाचे खुडे मागील सप्ताहात सुरू झाले. त्यास प्रतिकिलो १२० ते १३० रुपये दरम्यान दर मिळाला. काढणीपश्‍चात या द्राक्षांची निर्यात सुरू झाली असून पहिले दोन कंटेनर रशियासाठी रवाना झाले आहेत.

दक्षिण आशियायी देशांमध्ये सर्वांत पहिल्यांदा गोडी बहार फळ छाटणी घेऊन कसमादे भागात प्रामुख्याने सटाणा तालुक्यात द्राक्ष उत्पादन घेतले जाते. येथे ऑक्टोबरपासून खुडे सुरू होतात. गेल्या पाच वर्षांत नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका येथील द्राक्ष उत्पादकांना बसला. मात्र तरीही समस्यावर मात करत ‘अधिक जोखीम, अधिक दर’ या सूत्राप्रमाणे शेतकरी पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादन घेण्यात टिकून आहेत. एकीकडे नुकसानीमुळे बागाही तुटल्या आहेत. तर चालू हंगामात झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी संरक्षित शेतीचा अवलंब केला, अशा द्राक्ष उत्पादकांचे नुकसान झालेले नाही.

पहिल्या टप्प्यातील द्राक्ष मालाची निर्यात रशियामध्ये सुरू झाली आहे. मोहाडी (ता. दिंडोरी) येथील ‘एकनाथ ॲग्रो एक्स्पोर्ट’ या कोल्ड स्टोअरेजमधून गुरुकृपा कॉर्पोरेशन यांचा १, तसेच नीरज एक्स्पोर्ट यांचा १ असे सुरुवातीच्या टप्प्यात २ कंटेनर रवाना झाले आहेत. पूर्वहंगामी द्राक्ष शुभारंभ बिजोटे (ता. सटाणा) येथील शेतकरी जयवंत जाधव यांच्या बागेत झाला होता. याशिवाय तालुक्यातील अण्णा खैरनार, भास्कर देवरे, राजाबाई देवरे, परशुराम देवरे, निवृत्ती कोर अशा शेतकऱ्यांचाही द्राक्ष मालाचे खुडे निर्यातदारांनी केले आहेत.

निर्यातीसाठी रोग-कीड संबंधित तपासण्या व तांत्रिक बाबी कृषी विभागाच्या शेतीमाल निर्यात सुविधा कक्षाच्या माध्यमातून करण्यात आल्या. निर्यात प्रमाणपत्र दिल्यानंतर हा कंटेनर राशियासाठी रवाना झाले. या वेळी कृषी उपसंचालक जगदीश पाटील, निर्यात कक्षाचे कृषी अधिकारी लितेश येळवे, कृषी सहायक कुणाल पाटकर या वेळी उपस्थित होते.

‘निर्यातवाढीसाठी प्रयत्नांची गरज’

संधीच्या तुलनेत द्राक्षनिर्यात कमी होत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली स्थिती, झालेली भाडेवाढ व वाढलेले निर्यातीचे अंतर यामुळे हा फटका आहे. मागील काही वर्षात दर आठवड्याला जहाजांची उपलब्धता असायची. मात्र आता ते पंधरा दिवसांत होतात. केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करून निर्यातवाढीसाठी धोरण हाती घ्यावे. तसेच ज्याप्रमाणे गुजरात व कर्नाटक राज्यात आंबा निर्यातीसाठी अर्थसाह्य केले जाते त्याच धर्तीवर पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादकांसाठी धोरणांची व हस्तक्षेपाची गरज आहे, असे द्राक्ष निर्यातदार नील पेडणेकर यांनी सांगितले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: टोमॅटो दरात सुधारणा; सिताफळाला चांगला भाव, गवार तेजीत तर हळद-केळी दर स्थिर

Monsoon Rain: राज्यात पाऊस कमी होणार; मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार

Solar Project Nashik : दिवसा वीज देण्यासाठी सौरप्रकल्प पूर्ण करा

Livestock Market : बुलडाणा जिल्ह्यात जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बहिष्कार

Day-Time Electricity : अकोलेकाटी परिसरात दिवसा वीजपुरवठा

SCROLL FOR NEXT