Grape Export
Grape ExportAgrowon

Grape Export : ऐन दुष्काळात ३२ कोटींचे द्राक्ष युरोपात

Grape Market : ऐन खरिपात पिके शेतात करपली, रब्बी तर पिकलाच नाही, शिवाय ७५ वर गावे-वाड्या टँकरवर तहान भागवत आहेत.

Nashik News : ऐन खरिपात पिके शेतात करपली, रब्बी तर पिकलाच नाही, शिवाय ७५ वर गावे-वाड्या टँकरवर तहान भागवत आहेत. अशी भयावह दुष्काळी परिस्थिती असलेल्या येवल्यातील जिगरबाज शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या नाकावर टिचून निर्यातक्षम द्राक्ष पिकविली आहेत. प्रतिकूल वातावरणात कृषी विभागाच्या सल्ल्याने थोडीथोडकी नव्हे तर साडेचार टन पिकवलेले द्राक्ष थेट नेदरलँड, जर्मनी, युके, डेनमार्क, रशिया आदी देशांमध्ये पोचली असून तेथे भाव खात आहेत.

यावर्षीचा द्राक्ष हंगामाचा प्रवास अडथळे पार करत झाला. सुरवातीला द्राक्ष हंगामाला नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. ऐन निर्यात हंगाम सुरु झाल्यानंतर रशिया- युक्रेन युद्धामुळे राज्यातील द्राक्ष निर्यात पूर्णपणे थांबली होती. त्यानंतर मार्ग काढत दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून निर्यात सुरु झाली.

तरीही यंदा राज्यातून ३१ मार्च २०२४ अखेरपर्यंत १ लाख ४९ हजार ७२१ टन द्राक्ष निर्यात करण्यात आली आहे. यावर्षीच्या हंगामामध्ये प्रामुख्याने रशिया, चीन, यूएई, मलेशिया, बांगलादेश देशांमध्ये एकूण ३५ हजार ७२२ टन द्राक्ष निर्यात करण्यात आली. तर नेदरलँड, जर्मनी, बेल्झियम, डेन्मार्क या युरोपियन देशांमध्ये सर्वाधिक १ लाख १३ हजार ९९९ टन द्राक्ष निर्यात झाली आहे.

Grape Export
Grape Export : युरोपियन बाजारपेठेत भारतीय द्राक्षांना वाढती मागणी ; निर्यातीत १० टक्क्यांची वाढ

तालुक्यात तर सुरवातीपासून अत्यल्प पावसाचा फटका द्राक्ष बागांना बसला असला तरी कधी पालखेडच्या आवर्तनाचे पाणी तर सरतेशेवटी कृषी विभागाच्या माध्यमातून साकारलेल्या शेततळ्यातील पाण्यावर शेतकऱ्यांनी बागा फुलवल्या अन जिद्दीने शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्ष पिकवलीच.

राज्यात ९४ तालुके कायमचे टंचाईग्रस्त असून ब्रिटिशकालीन दुष्काळी असलेल्या येवल्याचे नाव टॉपला आहे. मात्र ठिबक, शेततळयासह अनेक पर्याय शोधून येथील शेतकऱ्यांनी प्रयोगशीलतेतून जगाला गवसणी घातली आहे. यंदा दुष्काळ, बेमोसमी पाऊस अन लहरी हवामानामुळे द्राक्ष बागा निघणार की नाही याची शाश्वती नव्हती पण या संकटावर मात करून द्राक्ष निर्यात करून येथील शेतकऱ्यांनी आपली जिद्द सोडलेली नाही हे विशेष.

यावर्षी येवल्यामध्ये द्राक्ष निर्यातीसाठी ६८१ शेतकऱ्यांनी ३६१ हेक्टर क्षेत्र नोंदवले होते. यातील तब्बल ४२५ शेतकऱ्यांनी २३० हेक्टर वरील द्राक्ष निर्यात केली आहेत. यावर्षी थॉमसन, क्रिमसन, सोनाका आदी वाणाचे द्राक्ष युरोप, नेदरलँड, डेन्मार्क, स्वीडन व अरब देशांत पोहोचली आहे. विशेष म्हणजे द्राक्षाला सरासरी ७१ रुपयाचा प्रति किलोला चांगला भाव मिळाला आहे.

Grape Export
Grape Export : सांगलीतून ८०० टनांनी वाढली द्राक्षाची निर्यात

असे मिळाले उत्पन्न

तालुक्याच्या पश्चिम भागातील पाटोदा, पिंपरी, सोमठाणे, मुखेड,मानोरी आदी परिसरातच सर्वाधिक द्राक्ष बागा आहेत. या भागातील ४२५ शेतकऱ्यांनी यंदा द्राक्ष परदेशात पाठवली. २३० हेक्टरवरील तब्बल ४ हजार ५९५ टन द्राक्ष निर्यात झाली असून द्राक्षला ६० ते १२० रुपयांपर्यंतचा दर मिळाला तर सरासरी ७१ रुपये प्रति किलोला दर मिळाल्याने तब्बल ३२ कोटी ६२ लाख रुपयांचे चलन या द्राक्ष निर्यातीत शेतकऱ्यांच्या खिशात पडले आहे. विशेष म्हणजे मागील आठ वर्षात सर्वाधिक द्राक्ष निर्यात यावर्षी दुष्काळ असूनही झाली आहे.

द्राक्ष निर्यातीचे आकडे....

२०१५ - १६ ४०० टन

२०१६ - १७ सुमारे १८०० टन

२०१७ - १८ सुमारे २८७३ टन

२०१८ - १९ २८०० टन

२०१९ - २० ३७८६ टन

२०२० - २१ २७७१ टन

२०२१ - २२ ३९०० टन

२०२२ - २३ ३९७७ टन

२०२३ - २४ ४५९५ टन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com