नाशिक जिल्हा परिषद Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : टंचाई कृती आराखड्याबाबत नाशिक जिल्हा परिषद उदासीन

Zilla Parishad Scarcity Action Plan : नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पिण्यासाठी पाण्याचे टॅंकर सुरू असताना दुसरीकडे निम्मा नोव्हेंबर संपत आलेला असतानादेखील जिल्ह्याचा टंचाई कृतिआराखडा तयार झालेला नाही.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पिण्यासाठी पाण्याचे टॅंकर सुरू असताना दुसरीकडे निम्मा नोव्हेंबर संपत आलेला असतानादेखील जिल्ह्याचा टंचाई कृतिआराखडा तयार झालेला नाही. अहमदनगर जिल्ह्याचा टंचाई कृतिआराखडा तयार होऊन त्यास मंजुरीदेखील झाली. मात्र, नाशिक जिल्ह्याचा आराखडा अद्याप तयार झालेला नाही. यावरून जिल्हा परिषद प्रशासन टंचाई आराखड्याबाबत उदासीन असल्याचे चित्र आहे.

गत वर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले होते. धरणे ओव्हरफ्लो होती. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होती. पर्यायाने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात टंचाईच्या झळा लागल्या नाहीत. मात्र, मार्च ते जून २०२३ या टप्प्यात टंचाई मोठी जाणवली. या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील टॅंकरची संख्या १५० वर पोहोचली होती. यंदा सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने टंचाईच्या झळा ऑगस्ट-सप्टेंबरपासून जाणवू लागल्या असल्याने टॅंकर सुरू झालेले आहेत.

साधारण १५ ऑक्टोबरपर्यंत झालेल्या पावसाचा अंदाज घेऊन दर वर्षी टंचाई कृतिआराखडा तयार होत असतो. यासाठी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून तालुकानिहाय आराखडे मागविले जातात. सप्टेंबरपासून विभागाकडून तालुका आराखडे मागविले जात आहेत. परंतु अद्याप १५ तालुक्यांपैकी दोन तालुक्यांतून आराखडे प्राप्त झालेले नाहीत.

बागलाण व कळवण तालुक्याने अद्याप आराखडे सादर केलेले नाहीत. सर्व तालुका आराखड्यावरून जिल्हा टंचाई कृतिआराखडा तयार केला जातो. परंतु २० नोव्हेंबर उजाडूनदेखील अद्याप हा आराखडा तयार झालेला नाही. एव्हाना टंचाई कृतिआराखडा तयार करून त्यास मंजुरी मिळणे अपेक्षित होते. मात्र, याबाबत प्रशासनाला गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

विभागाला अधिकारी नसल्याचा फटका

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंतापद रिक्त आहे. सध्या या पदाचा पदभार बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांच्याकडे आहे. विभागाला पूर्णवेळ कार्यकारी अभियंता मिळावा, यासाठी प्रशासनाने पाच पत्र मंत्रालयात दिली आहेत. मात्र, अद्याप अधिकारी मिळालेला नाही. कार्यकारी अभियंता सोनवणे यांच्याकडे बांधकाम मोठा विभाग आहे. ग्रामीण पाणीपुरवठ्यात जलजीवनच्या कामांवर त्यांचा भर असतो. त्यामुळे आराखड्यास उशीर होत असल्याची चर्चा आहे.

आठवड्यात वाढले सहा टॅंकर

गत आठवड्यात ३४० गावे, वाड्या यांना ९८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, आठवडाभरात टंचाईच्या झळा वाढल्याने टॅंकरच्या संख्येत सहाने वाढ झाली आहे. सद्यःस्थितीत १३१ गावे, २३७ वाड्या अशा एकूण ३६८ गावे-वाड्यांना १०४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक टॅंकर नांदगाव तालुक्यात सुरू आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rainfall : नांदेड जिल्ह्यात आजवर १८४ मिलिमीटर पावसाची तूट

South Solapur Water Crisis : उशाशी भीमा-सीना नद्या असूनही दक्षिण सोलापूर कोरडा ठणठण

Soybean Crop Damage: शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपले

Jalna Zilla Parishad Schools: पुढील दोन वर्षांत ५०० जिल्हा परिषद शाळांचा विकास करा : पालकमंत्री पंकजा मुंडे

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

SCROLL FOR NEXT