Nashik Jilha Bank agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Jilha Bank : नाशिक जिल्हा बँक ना बरखास्त होणार, ना विलीन

Empowerment of Nashik District Bank : नाशिक जिल्हा बँकेचे सक्षमीकरण हे राज्य शासनाचे प्राधान्य असून, अडकलेल्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित असून, त्यावरील व्याज देण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Team Agrowon

Nashik : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही इतर बँकांत विलीन होणार नाही आणि तिला बरखास्त करण्याचे कोणतेही शासन धोरण नाही, अशी स्पष्ट ग्वाही महाराष्ट्र सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. जिल्हा बँकेचे सक्षमीकरण हे राज्य शासनाचे प्राधान्य असून, अडकलेल्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित असून, त्यावरील व्याज देण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक येथील शंकराचार्य न्यास सभागृहात सोमवारी (ता. २६) आयोजित राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या कार्यक्रमात अनास्कर बोलत होते. या वेळी व्यासपीठावर अध्यक्ष काका कोयटे, जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, संचालिका ॲड. अंजली पाटील व नारायण वाजे उपस्थित होते.

जिल्हा बँकेत पतसंस्था व ठेवीदारांच्या सुमारे २२२ कोटींच्या ठेवी अडकलेल्या असून, या ठेवींवरील व्याजदेखील काही काळापासून थांबले आहे. मात्र बँक पूर्वपदावर आल्यानंतर टप्प्याटप्प्याने ठेवी परत दिल्या जातील आणि व्याजही नियमितपणे दिले जाईल, असा विश्वास अनास्कर यांनी व्यक्त केला. राज्य सहकारी बँकेने काढलेल्या कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक लाभदायक असून, पतसंस्थांनी याचा विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

नागपूर जिल्हा बँकेप्रमाणेच जिल्हा बँकेचेही पालकत्व राज्य सहकारी बँकेने स्वीकारावे, अशी मागणी डॉ. ढिकले यांनी या वेळी केली. कार्यक्रमात ‘सहकार बास्केट’ या नव्या ॲपचे अनावरण करण्यात आले. ॲड. पाटील यांनी सूत्रसंचालन तर नारायण वाजे यांनी आभार मानले.

नवीन जबाबदारी

अनुभवी सहकारी अधिकारी विद्याधर अनास्कर यांची लवकरच नाशिक जिल्हा बँकेच्या संस्थात्मक सल्लागारपदी नियुक्ती होणार असून, त्यानंतर बँकेच्या व्यवस्थापनाचे नेतृत्त्व त्यांच्या हाती येणार आहे.

नवीन ‘ओटीएस’ योजना लवकरच

थकित कर्जदारांसाठी नवीन ओटीएस योजना लवकरच आणली जाणार असून, त्याअंतर्गत काही सवलतींचा विचार केला जात आहे. राज्य शासनाने व्याजाचा ५० टक्के भार उचलण्याचाही विचार सुरू केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT