Bhandara Farmers Family : कौशल्यपूर्ण लाख उत्पादनातून सावरले कुटुंब

Rice Farming Bhandara : विदर्भातील नागपूर विभागात सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. यातील वर्धा वगळता उर्वरित पाचही जिल्ह्यांत धान (भात) हेच मुख्य पीक आहे.
Bhandara Farmers Family
Bhandara Farmers Familyagrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story: सर्वांत विपरीत परिस्थितीमध्येही आपली सकारात्मकता न सोडता संघर्ष करणाऱ्या महिलांच्या अनेक गाथा समाजामध्ये आहेत. दुर्गम भंडारा जिल्ह्यातील पौर्णिमा राहुले आपल्या पतीच्या निधनानंतर असाच लढवय्या बाणा जपत लाख उत्पादन व्यवसाय वाढवला आहे. हार न मानता लाख व्यवसायातून समृद्धीची वाट चोखाळत त्यांनी दोन मुलींच्या उच्च शिक्षणावर लक्ष केंद्रित केले आहे.

विदर्भातील नागपूर विभागात सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. यातील वर्धा वगळता उर्वरित पाचही जिल्ह्यांत धान (भात) हेच मुख्य पीक आहे. या पाच जिल्ह्यातील भाताखालील क्षेत्र सुमारे आठ लाख हेक्‍टरच्या घरात असून, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांना अनुक्रमे ‘राइस सिटी’ आणि ‘धानाचे कोठार’ म्हणून ओळखले जाते. मात्र एकाच पिकावर अवलंबून राहत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कमकुवत राहत आहे. म्हणूनच शासन स्तरावर पीक फेरपालट, दुबार पिके, पूरक व्यवसायांना प्रोत्साहन दिले जात आहे.

धानाचे कोठार असलेल्या भंडारा जिल्ह्यात मोठी वनसंपदा देखील आहे. येथील साकोली तालुक्‍यातील धर्मापुरी भागात पळस झाडाचे वन आहे. या गावातच माहेर आणि सासर असलेल्या पौर्णिमा राहुले यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. या शेतामध्येच त्यांचे पती विलास विहिरीच्या सिंचनावर भाजीपाला पिके घेत असत. या दाम्पत्याला ग्लोरी आणि सुहानी या दोन मुली असून, सारे काही सुरळीत असताना २०२० मध्ये पती विलास यांचे हृदयविकाराने निधन झाले. पौर्णिमाताई यांच्यासाठी हा मोठा आघात होता. पूर्वी घरकामात रमलेल्या त्यांच्यावर अचानक कुटुंबाची आणि आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारी आली. दोन मुलींच्या शिक्षणाची मोठी जबाबदारीच त्यांच्यावर होती.

Bhandara Farmers Family
Vidarbha Cotton Farming : कापूस उत्पादक पर्यायी पिकांच्या शोधात

लाख उद्योगात राखले सातत्य

पौर्णिमाताईंनी न डगमगता आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. भाजीपाला शेतीतील कामे आणि उत्पादने बाजारात नेण्याची धावपळ त्यांना फारशी जमणार नाही, हे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी भातशेतीला अन्य पर्यायी व्यवसायाची जोड देण्याचा निर्णय घेतला. कृषी विज्ञान केंद्र, साकोली येथे काही वर्षाआधी घेतलेल्या लाख उत्पादनाच्या प्रशिक्षणाची त्यांना आठवण झाली. याच कौशल्यपूर्ण व्यवसायात उतरण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.

...असे होते लाख उत्पादन

साकोली ‘केव्हीके’च्या तज्ज्ञ डॉ. उषा डोंगरवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पळस, बोर, आकाशमनी, पिंपळ या झाडांचा लाख उत्पादनासाठी उपयोग होतो. लाखेच्या मादी किडींपासून प्रजननानंतर स्त्रावाच्या स्वरुपात तयार होणाऱ्या पदार्थाला ‘लाख’ म्हणतात. भारतात ८० टक्‍के लाख उत्पादन रंगिनी जातीच्या किडींपासून मिळते. मात्र हे काम अत्यंत कौशल्यपूर्ण आहे. ज्या झाडावर लाख आढळते, त्या पळसाच्या फांद्या मजुरांकरवी छाटाव्या लागतात. त्यानंतर चाकू किंवा विळ्याचा वापर करून त्यावरील कच्च्या स्वरूपातील लाख वेगळे केले जाते.

साधारण १ क्‍विंटल लाख काढण्यासाठी तीन दिवस लागतात. दीड ते दोन महिन्यांच्या हंगामात पाच ते सात क्‍विंटल उत्पादन मिळते. त्याला साधारण १०० ते ६०० रुपये प्रति किलो असा दर मिळतो. कच्ची लाख गोंदिया येथील बाजारपेठेत विकली जाते. त्यावर खरेदीदारांकडून प्रक्रिया केल्यानंतर तयार लाखेचा उपयोग विविध क्षेत्रात उदा. दागिने निर्मिती, सील करणे, दारूगोळा आणि औषधांमध्ये केला जातो. या संपूर्ण कामात कौशल्यपूर्ण मजुरांना गावस्तरावरच रोजगारही उपलब्ध होतो.

मुलींना केले उच्चशिक्षित

पतीच्या निधनानंतर न डगमगता पौर्णिमाताईंनी थोडे अधिक कौशल्य लागणाऱ्या या व्यवसायात उतरण्याचे धाडस दाखवले. त्यातून आपल्या कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. त्यांची मोठी मुलगी ग्लोरी ही बी. एस्सी ॲग्री करत आहे, तर दुसरी मुलगी सुहानी नववीत शिकत आहे. या मुलींना उच्चशिक्षित करण्याचे ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे.

पौर्णिमा राहुले ७२१८१७०९७५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com