Simhasta Kumbh Nashik  Agrowon
ॲग्रो विशेष

Simhasta kumbh Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर

Nashik Kumbh Mela : नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात व अमृत स्नानाच्या तारखा रविवारी (ता. १) जाहीर करण्यात आल्या.

Team Agrowon

Nashik News : नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात व अमृत स्नानाच्या तारखा रविवारी (ता. १) जाहीर करण्यात आल्या. यात सिंहस्थ कुंभमेळ्याचा प्रारंभ ३१ ऑक्टोबर २०२६ ला होणार असून प्रथम अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७ तर महाकुंभस्नान अर्थात द्वितीत अमृतस्नान ३१ ऑगस्ट रोजी आणि तृतीय अमृतस्नान नाशिक येथे ११ सप्टेंबर तर त्र्यंबकेश्‍वर येथे १२ सप्टेंबर रोजी होणार आहे.

कुंभमेळ्यामध्ये मुख्य तीन पर्वण्यांव्यतिरिक्त पर्वस्नानाचे एकूण ४४ मुहूर्त असून त्रंबकेश्वर येथे पर्वस्नानाचे एकूण ५३ मुहूर्त आहेत. २४ जुलै २०२८ रोजी सिंहस्थाचा समारोप होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.

या वेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यांसह १३ आखाड्यांचे प्रमुख संत, पदाधिकारी उपस्थित होते.

नाशिक येथे सिंहस्थ पर्वकालातील सर्व एकादशी, पौर्णिमा, अमावस्या वैधृती व्यतिपात योग हे दिवस भाविकांसाठी तीर्थस्थान, दर्शन पर्व असतील.

साधू-महंतांच्या उपास्थितीत कुंभमेळ्याच्या तारखांची घोषणा होणे ही खऱ्या अर्थाने कुंभपर्वाची सुरुवात आहे, असे श्री. फडणवीस म्हणाले. कुंभमेळा सुरक्षित, निर्मळ आणि पवित्र वातावरणात होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marine Product Exports : भारत कृषी आणि सागरी उत्पादनांचा सर्वात मोठा निर्यातदार देश होईल; केंद्रीय वाणिज्यमंत्र्यांचा विश्वास

MGNREGA Scheme: रोजगार हमी योजनेतील गोंधळ थांबविण्याची मागणी

Ai Conference: ‘एआय’ परिषदेत सात कोटी कशावर खर्च केले?

Panchayat Samiti Chairman: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा पंचायत समिती सभापती भाजपाचे

Congress Protest: 'सरेंडर दे सिलिंडर'; गॅसचं पोस्टर घेऊन पटोले, वडेट्टीवार विधानभवनात

SCROLL FOR NEXT