Agriculture Department Scheme: कृषी विभागाच्या विविध योजना

Farm Schemes India: भारतीय हवामान खात्याच्या दीर्घकालीन पाऊस अंदाजानुसार राज्यात चालू वर्षी सरासरीच्या १०६ टक्के पाऊस अपेक्षित आहे. यामुळे यावर्षी चांगले उत्पादनवाढीच्या दृष्टीने अनुकूल वातावरण आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहेत.
Agriculture Department Scheme
Agriculture Department SchemeAgrowon
Published on
Updated on

Agriculture Schemes:

रासायनिक खत अनुदान

केंद्र शासनामार्फत रासायनिक खतांवर अनुदान देण्यात येते. याद्वारे खतांच्या किमती शेतकऱ्यांच्या आवाक्यात ठेवण्याच्या प्रयत्न करण्यात येतो.

अन्नद्रव्यनिहाय अनुदानाचे दर

युरिया वगळता इतर खतांचे विक्री किंमत ठरवण्याचे अधिकार खत कंपन्यांना देण्यात आले आहेत. युरिया (४६:०:०) खताच्या विक्री किमती स्थिर आहेत. २६६.५० रुपये प्रति ४५ किलो गोणी विक्री किंमत आहे. - २०२५-२६ साठी (१ एप्रिल, २०२५ ते ३० सप्टेंबर, २०२५) केंद्र शासनाने प्रति टन ग्रेडनिहाय अनुदानाचे दर खालील प्रमाणे घोषित केले आहेत. त्यातील ठळक खतांचे दर पुढीलप्रमाणे आहेत .

खत अनुदानित सर्वसाधारण विक्री किंमत प्रति गोणी (५० रुपये प्रति किलो) *

युरिया (४५ किलो बॅग २६६.५८ *

डीएपी१८:४६:०:० १३५०

एमओपी ०:०:६०:० १५००-१६५०

एसएसपी (G)०:१६:०:११ ५००-५७०

एनपीके१९:१९:१९ १७५०

एनपीकेएस-१५:१५:१५:०९ १४५०-१४७०

राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षा अंतर्गत पिके :

अन्नधान्य पिके

समाविष्ट पिके : भात, कडधान्य, भरडधान्य (मका) आणि पौष्टिक तृणधान्य (ज्वारी, बाजरी, नागली, वरई) असून या योजनेत राबविण्यात येणाऱ्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत- सलग पीक प्रात्यक्षिके, पीक पद्धतीवर आधारीत प्रात्यक्षिके, आंतरपीक प्रात्यक्षिके,प्रमाणित बियाणे उत्पादनास अर्थसाहाय्य,प्रमाणित बियाणे वितरण,एकात्मिक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापन,पीक पद्धतीवर आधारीत प्रशिक्षण.

Agriculture Department Scheme
Fake Fertilizers: न्हावरे येथे बनावट खत निर्मितीचा पर्दाफाश

ऊस विकास योजना 

ऊस पिकात आंतरपीक प्रात्यक्षिके,उती संवर्धित रोपांचे वाटप, पीक संरक्षणासाठी कीडनाशके, बायोएजंटसचे वितरण, पाचट व खोडवा व्यवस्थापन प्रात्यक्षिके राबविण्यात येतात. 

कापूस विकास कार्यक्रम

या योजनेत १) धुळे २) जळगाव ३) अहिल्यानगर ४) छत्रपती संभाजीनगर ५)जालना ६)बीड ७)नांदेड ८)परभणी ९) बुलडाणा १०) अकोला ११)वाशीम १२) अमरावती १३)यवतमाळ १४) वर्धा १५)नागपूर १६) चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आंतरपीक आद्यरेषिय प्रात्यक्षिके,सरळ वाणांची अतीघन लागवडीची प्रात्यक्षिके, एकात्मिक पीक व्यवस्थापन (आयसीएम) प्रात्यक्षिके, कापूस पिकाचे फरदड निर्मुलन प्रात्यक्षिके, पीक संरक्षणासाठी कीडनाशके, बायोएजंटस चे वितरण हे घटक राबविण्यात येतात.

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- तेलबिया

या योजनेत सुधारित बियाणे अनुदानावर वाटप, पीक उत्पादन प्रात्यक्षिके , आंतरपीक प्रात्यक्षिके ,बियाणे उत्पादन कार्यक्रमासाठी अनुदान योजना राबविण्यात येते.

परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती)

या योजनेत शेतकरी गट, उत्पादक कंपनी यांची ३ वर्षे कालावधीसाठी निवड करून त्यांना ३१, ५०० रुपये प्रति हेक्टर (प्रति शेतकरी दोन हेक्टरच्या मर्यादेत) तीन वर्षात म्हणजेच ६.३० लाख रुपये प्रति गट लाभ दिला जातो.

यामध्ये सेंद्रिय शेतीवर आधारित प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, शेतात सेंद्रिय निविष्ठा निर्मिती करणे, सेंद्रिय प्रमाणीकरण करणे, सेंद्रिय मालाची मूल्यवृद्धी करून विक्री व्यवस्था करणे या बाबींसाठी अर्थसाहाय्य दिले जाते.

कृषी यांत्रिकीकरण

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचानानुंसार अधिसूचित कृषी यंत्र, अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसाहाय्य देण्यात येते.  प्रामुख्याने ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्रे, ट्रॅक्टरचलित अवजारे, ट्रॅक्टरचलित पीक संरक्षण अवजारे व पीक काढणी पश्चात प्राथमिक प्रक्रिया अवजारे यांचा समावेश आहे. 

सर्वसाधारणपणे किमतीच्या ४० ते ५० टक्के किंवा केंद्र शासनाने घोषित केलेली उच्चतम अनुदान मर्यादा यापैकी कमी असेल ते, याप्रमाणे अनुदान देण्यात येते. 

Agriculture Department Scheme
Certified Turmeric Seed : ‘महाबीज’कडून हळद बेणे उत्पादनासाठी चाचपणी

कृषी अवजारे बँकेच्या स्थापनेसाठी भांडवली खर्चाच्या ४० टक्के अनुदान देण्यात येते.

इच्छूक शेतकऱ्यांकडून https://mahadbt.maharashtra.gov.in/ या पोर्टलवर अर्ज मागविण्यात येतात.

लाभार्थी निवडीच्या पारदर्शकतेसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर ही योजना राबविण्यात येत आहे.

कृषी उन्नती योजनेअंतर्गत अन्न व पोषण सुरक्षा योजना ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम

शेतकऱ्यांकडील स्वत:च्या बियाण्याची गुणवत्ता वाढविणे.गुणवत्तापूर्ण/प्रमाणित बियाणांची उपलब्धता वाढवून विविध पिकांच्या उत्पादन व उत्पादकतेमध्ये वाढ करणे.नवीन वाणाचा वापर वाढविणे, बियाणे बदल दरामध्ये वाढ करणे.

स्वरूप:

महाबीजमार्फत लाभार्थी शेतकऱ्यांना एक एकर क्षेत्र मर्यादेत कडधान्य व गळीतधान्य बियाण्यांसाठी जास्तीत जास्त ६० टक्के आणि तृणधान्य बियाणांसाठी जास्तीत जास्त ५० टक्के अनुदानित दराने स्रोत बियाणे पुरवठा करण्यात येतो.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN)

शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत शेतकऱ्यांना ३ हप्त्यांत एकूण ६००० रुपये प्रति वर्षी लाभ दिला जातो.पात्र शेतकऱ्यांनी त्यांचा ॲग्रीस्टॅक क्रमांक नोंदणी आणि ई-केवायसी इत्यादी प्रलंबित बाबी असल्यास त्या पूर्ण कराव्यात.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (NSMNY)

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी पी.एम. किसान योजनेच्या धर्तीवर पी.एम. किसान योजनेच्या पात्र लाभार्थींना राज्य शासनातर्फे वार्षिक ६००० रुपये तीन समान हप्त्यांमध्ये देण्यात येतात.यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये काही बाबी अपूर्ण असल्यास त्या पूर्ण कराव्यात.

Agriculture Department Scheme
Bhavantar Yojana: कांद्याला भावांतर योजना लागू करा

प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY)

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी PMFBY पोर्टल https://pmfby.gov.in वर स्वत: शेतकरी यांना तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र (CSC) यांच्या मार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येते.सदरची योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.खरीप हंगामामधील अधिसूचित पिके ः भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद,भुईमूग, सोयाबीन, तीळ, कारळे, कापूस, कांदा.

प्रधानमंत्री पीक विमा

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना मृग बहरामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ व द्राक्ष (क) या ८ फळपिकांसाठी महसूल मंडळ हा घटक धरुन राबविण्यात येत आहे. यात केंद्र शासनाचे पीक विमा संकेतस्थळावर NCIP portal वर जाऊन साधारण विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के विमा हप्ता भरून सहभाग घेतला जातो. यात शेतकऱ्याने भरलेल्या विमा हप्ता पेक्षा जास्त असलेला विमा हप्ता शासन अनुदान म्हणून भरते.

हवामान घटक आधारित हवामान धोके निश्‍चित करून त्यानुसार महसूल मंडळ स्तरावर नुकसान भरपाई निश्‍चित करण्यात येते . यात कमी पाऊस, जास्त पाऊस, जास्त आर्द्रता, पावसातील खंड अशा हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण दिले जाते.

संपर्क: व्हाट्सअप ऑटो रिप्लाय सुविधा ८०१०५५०८७० : शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती त्यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर दिली जाते.

कृषी विभागाची वेबसाइट: www.krishi.maharashtra.gov.in वर विविध योजनांची माहिती दिली जाते.

सदर योजनांच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

( लेखक कृषी आयुक्तालयात कृषी प्रक्रिया व नियोजन विभागाचे संचालक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com