Nashik News : जिल्ह्यात सलग नवव्या दिवशी पावसाने शेती पिकांची नुकसान वाढवले आहे. मंगळवारी (ता. १३) रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाने कळवण, दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वाधिक नुकसान आहे.
कृषी विभागाने जाहीर केलेल्या प्राथमिक नुकसान अहवालानुसार सिन्नर, चांदवड, निफाडसह इतर तालुक्यात ६७५ हेक्टर क्षेत्रावर नुकसान समोर आले आहे. कांदा, आंबा, टोमॅटो व इतर भाजीपाला पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे.
अस्मानी संकटामुळे शेतकरी हैराण असून दररोज होत असलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान वाढत आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे ११० गावांमध्ये २,११८ शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. यामध्ये कांदा पिकाला सर्वाधिक फटका बसला. तर आंबा काढणी हंगाम सुरू असतानाच पावसामुळे मोठी हानी झाली आहे. वादळी वाऱ्यासह पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी कैऱ्या तुटून पडल्याने हंगाम अडचणीत सापडला आहे.
दिंडोरी व कळवण तालुक्यात कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान आहे. तर चांदवड, सिन्नर, इगतपुरी तालुक्यात फटका बसला आहे. इगतपुरी तालुक्यात झालेल्या मुसळधारणे अनेक भागात दाणादाण उडवली आहे. भंडारदरा वाडी परिसरात झालेल्या अतिवृष्टी सदृश पावसामुळे काढणी केलेल्या कांदा पाण्याखाली गेल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. यासह कळवण तालुक्यातील बेलबारी परिसरात झालेल्या मुसळधारेने नवीन मिरची लागवडीमध्ये सरी तुंबून पाणी वाहिल्याचे पाहायला मिळाले.
इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांची अस्मानी संकटांची मालिका सुरूच आहे. येथे सलग पाच दिवसांपासून होत असलेल्या गारांसह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. खरीप आणि रब्बी हंगामातही अस्मानी संकट शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. काकडी, दोडकी, टोमॅटो, वांगी, कांदा, मका, गहू, भाजीपाला, जनावरांचा चारा व उघड्यावर असलेला संसार यांसह वीटभट्टी व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. बागायत पिकांना पावसाचा तडाखा बसला आहे.
पीकनिहाय नुकसान :
पीक नुकसान(हेक्टर)
कांदा ३७७.४५
आंबा १२९.८०
टोमॅटो २८.९०
भाजीपाला व इतर...
बाजरी ३८.३५
मका ३.०५
वीज पडून नऊ जनावरे मृत्युमुखी
ओझर येथे दुपारी ४ वाजता भारत शिवराम पल्हाळ यांच्या मेंढ्यांवर वीज पडून ८ मेंढी १ शेळी असे एकूण ९ गाभण जनावरे मृत झाल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.