Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात दमदार पावसाने सरासरी गाठली

Monsoon Rain Update : नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवस पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याच्या सर्वच भागात झालेल्या पावसामुळे खरिपातील पिकांना उभारी मिळाली आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात मागील तीन दिवसात झालेल्या दमदार पावसाने आजपर्यंत पडणाऱ्या पावसाने सरासरी गाठली आहे. १ जून पासून रविवार (ता.२७) पर्यंत सरासरी ३३६.६० मिलिमीटर पाऊस पडला.हा पाऊस हंगामी सरासरीच्या ९१.४२ टक्के इतका आहे. वार्षिक सरासरीच्या ३७.७५ टक्के पर्जन्यमान झाल्याची माहिती महसूलच्या सूत्रांकडून मिळाली.

नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवस पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याच्या सर्वच भागात झालेल्या पावसामुळे खरिपातील पिकांना उभारी मिळाली आहे. जिल्ह्यात झालेला पाऊस तालुकानिहाय पाहता बिलोली (३६७.१० मिमी) व कंधार (३८२.४० मिमी) या तालुक्यांनी सरासरीहून अधिक पावसाची नोंद केली आहे.

त्यांची टक्केवारी अनुक्रमे ९९.९१ टक्के व ९५.०६ टक्के इतकी आहे. तर लोहा, हदगाव, भोकर व हिमायतनगर या तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः लोहा तालुक्यात केवळ ८३.४० मिमी पावसाची नोंद असून ती सरासरीच्या फक्त २७.७७ टक्के आहे. रविवारी सकाळपर्यंत नोंद झालेल्या आकडेवारीनुसार नांदेड तालुक्यात सर्वाधिक ८१.६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

तर किनवट व उमरी येथे अनुक्रमे २.५० मिमी आणि ३.५० मिमी इतका अल्प पाऊस झाला. मागील वर्षी याच कालावधीत ४१८.०० मिमी पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदाचा पाऊस ११३.५३ टक्के टक्केवारीने कमी आहे.

जिल्ह्यातील एकूण १५ तालुक्यांपैकी बहुतांश तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यमान झाल्याचे दिसते. मात्र, काही तालुक्यांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आगामी काही दिवसांत मुसळधार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पर्जन्यमान आकडेवारी

वार्षिक सरासरी - ८९१.३०

आजपर्यंत पडणारा पाऊस - ३७६.१०

आजपर्यंत पडलेला पाऊस - ३३६.६०

वार्षिक सरासरीनुसार पाऊस - ३७.७५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Growth: महाराष्ट्राच्या शेतीची अतिवृष्टीने वाताहत ; विकास दर ५.७ टक्क्यांनी घसरला

Agrowon Podcast: सोयाबीन आज स्थिर, कापूस भाव कमीच, हरभरा दबावात, वांग्याला उठाव, कारले टिकून

Maize Price: मक्याला एक हजार हमीभाव फरक द्या, अब्दुल सत्तार यांची विधानसभेत मागणी

Weather Update: राज्यात उन्हाचा चटका वाढला; कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज कायम

Nana Patole statement : 'सरकारने 'बनिया' वृत्ती सोडावी'; सोयाबीन, कापूस, पिकविमा आणि पीएम किसानवरून नाना पटोलेंची सरकारवर टिका

SCROLL FOR NEXT