Bribe Agrowon
ॲग्रो विशेष

Nagar Bribe News : नगर जिल्हा परिषदेतील लिपिकाला लाच घेताना अटक

Arrest In Bribe : गावातील सभा मंडपाच्या बांधकामाची वर्क आर्डर काढण्यासाठी तेवीस हजारांच्या लाचेची मागणी केली.

Team Agrowon

Nagar News : जिल्हा परिषदेतील लाचखोरीचे प्रकार थांबण्याचे नावे घेईना. गावातील सभा मंडपाच्या बांधकामाची वर्क आर्डर काढण्यासाठी तेवीस हजारांच्या लाचेची मागणी केली. तर, २२ हजार ५०० रुपये स्वीकारताना नगर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कर्मचाऱ्याला शुक्रवारी (ता.१) जिल्हा परिषदेतच नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

संतोष बाळासाहेब जाधव (वय ३९, रा.विद्या कॉलनी, कल्याण रोड, नगर) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव असून, तो कनिष्ठ सहायक पदावर कार्यरत आहे. नगर जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा विभागात सातत्याने मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारे पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी असतात.

या धीही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. गुरुवारी (ता. ३० नोव्हेंबर) पाथर्डी तालुक्यातील जांभळी येथील सभा मंडपासाठी आमदार निधीतून १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. नियोजन समितीने या कामाला प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला वर्क ऑर्डर काढण्याचे आदेश दिले होते.

बांधकाम विभागातील कनिष्ठ सहायक जाधव याने वर्क ऑर्डर काढण्यासाठी मंजूर झालेल्या रकमेच्या दीड टक्के रक्कम लाच म्हणून मागणी केली होती. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे शुक्रवारी (ता.१) तक्रार प्राप्त झाल्यानंतर पथकाने जिल्हा परिषदेत सापळा लावला होता.

तेवीस हजारांची मागणी केल्यानंतर तडजोडीअंती साडेबावीस हजार स्वीकारण्याचे जाधव याने पंचासमक्ष मान्य केले. त्यानंतर तक्रारदार यांच्या पतीकडून लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने जाधव याला रंगेहाथ पकडल्याची माहिती लाच लुचपत विभागाच्या पोलिसांनी दिली. जिल्हा परिषदेत या कारवाईने खळबळ उडाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT