Agriculture Development: शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांची राज्यस्तरीय विविध कृषी पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. दापशेड (ता. लोहा) येथील विश्वनाथ होळगे यांना कृषीभूषण (सेंद्रिय शेती), बन्नाळी (ता. धर्माबाद) येथील दिगंबर खपाटे यांना युवा शेतकरी पुरस्कार, कुडली (ता. देगलूर) येथील सुनील चिमनपाडे यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट), तर कुपटी खुर्द (ता. किनवट) येथील नामदेव फोले यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट) जाहीर झाला आहे..बन्नाळी येथील युवा शेतकरी दिगंबर शंकर खपाटे यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेती, मृदा व जलसंवर्धन, कृषी प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन आणि थेट ग्राहक विक्री या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. धर्माबाद येथील 'श्री शिवशंकर मिनी दाल मिल' या कृषी प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःच्या तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या उत्पादनांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धन केले आहे. 'शेतकरी ते थेट ग्राहक' या संकल्पनेतून त्यांनी राज्यासह परराज्यांतही विक्रीचे जाळे उभारले आहे..Agriculture Award: कृषी पुरस्कार अर्ज ऑनलाइन.दापशेड येथील विश्वनाथ होळगे यांनी 'आर्या नैसर्गिक शेती'च्या माध्यमातून विषमुक्त नैसर्गिक अन्नधान्य चळवळ उभी केली आहे. ते शेतीमध्ये कोणत्याही प्रकारची रासायनिक खते किंवा कीटकनाशकांचा वापर न करता अग्निअस्त्र, ब्रह्मास्त्र, दशपर्णी अर्क, जीवामृत, घनामृत यांसारख्या नैसर्गिक निविष्ठांचा वापर करतात. गावरान गाय हा त्यांच्या नैसर्गिक शेतीचा प्रमुख आधार आहे. .Agriculture Award: भाऊसाहेब माने प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.महाराष्ट्र शासनाने त्यांची 'मास्टर ट्रेनर' म्हणूनही नियुक्ती केली असून भारत सरकारच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाची त्यांनी प्रभावी अंमलबजावणी केली आहे. कुडली (ता. देगलूर) येथील सुनील चिमनपाडे यांनी रब्बी हंगामात करडई पिकाचे विक्रमी उत्पादन घेऊन सलग तीन वेळा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केले आहेत. तसेच ते सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून भाजीपाला पिकांचेही उत्पादन घेत आहेत..किनवट तालुक्यातील कुपटी खुर्द येथील आदिवासी शेतकरी नामदेव फोले यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग करून उत्पादनात सातत्य राखले आहे. आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करून त्यांनी आदर्श शेतीचा नमुना उभा केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.