NABH Certificate  Agrowon
ॲग्रो विशेष

Ayurvedic Clinic : तीन आयुर्वेदिक दवाखान्यांना `एनएबीएच`चे प्रमाणपत्र

सुदर्शन सुतार

Solapur News : सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे असलेल्या जिल्ह्यातील तीन आयुर्वेदिक दवाखान्यांना ‘एनएबीएच'चे प्रमाणपत्र मिळाले आहे. या कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी आरोग्य विभागाच्या टीमचा सन्मान केला.

आरोग्य विभागाअंतर्गत जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुर्वेद दवाखाने व उपकेंद्र अशा एकूण ५१४ आरोग्य संस्था कार्यरत आहेत. यातील बरीच आरोग्य केंद्र आणि चार आयुर्वेद दवाखाने आयएसओ मानांकन प्राप्त आहेत.

नुकतेच भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) नवी दिल्ली यांच्याकडून जिल्ह्यातील तीन शासकीय आयुर्वेद दवाखान्यांना आरोग्य गुणवत्ता प्रतिष्ठित असे एनबीएएचचे मानांकन प्रमाणपत्र मिळाले आहे.

यामध्ये शासकीय आयुर्वेद दवाखाना, जिंती (ता. करमाळा), शासकीय आयुर्वेद दवाखाना, शेळवे (ता. पंढरपूर) आणि श्रीपिंपरी (ता. बार्शी) या आयुर्वेदिक दवाखान्याचा समावेश आहे. या आयुर्वेद दवाखान्यांमध्ये आयुर्वेदिक औषधी आणि योगासंबंधी गुणवत्तापूर्ण सेवा रुग्णांना दिली जाते.

मोफत आयुर्वेद औषध उपचारबरोबर विद्धकर्म, अग्निकर्म, नस्य, नाडी, स्नेहन-स्वेदन, मसाज, कपिंग अशा विविध सुविधा दिल्या जात आहेत. तसेच दररोज सकाळी तज्ञ योग प्रशिक्षकामार्फत योग सत्राचे आयोजन केले जात आहे.

‘नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रेडीशन कौन्सिल' ही भारतीय संस्थेच्या मान्यतेसाठी जबाबदार असलेल्या दोन प्रमुख संस्थांपैकी राष्ट्रीय मान्यता मंडळ हे एक आहे. या संस्थेमार्फत उच्च प्रशिक्षित मंडळामार्फत तपासणी करून सर्व रुग्णांना सुख सुविधा प्राप्त आहेत का ? यांचा अभ्यास करून एनएबीएच प्रमाणपत्र बहाल केले जाते.

या प्रमाणपत्रामुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधेवर उत्कृष्टतेचे शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांच्यासह जिल्हा आयुष अधिकारी डॉ विलास सरवदे यांचे अभिनंदन करत त्यांचा सन्मान केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT