Nashik News: संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी बुधवारी (ता. १४) त्र्यंबकनगरीत पौष वारी दिंडीसाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. ‘सकल तीर्थ निवृत्तीच्या पायी’ या श्रद्धेने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले. वारीच्या निमित्ताने त्र्यंबकनगरी सध्या भक्तीच्या रंगात चिंब भिजली असून, टाळ-मृदंगाच्या गजराने आसमंत दुमदुमून गेला. ‘याचि देही, याचि डोळा’ हा सोहळा अनेकांनी अनुभवला..‘निवृत्तिनाथ महाराज की जय...’ या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या लयबद्ध गजराने त्र्यंबकेश्वरमध्ये राज्यभरातून वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. हातात भगव्या पताका, कपाळी बुक्का आणि मुखात निवृत्तिनाथांचे नाव घेऊन ४०० हून अधिक दिंड्या शहरात दाखल झाल्या आहेत..Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा २५ हजार कोटींचा आराखडा.कुशावर्त तीर्थावर पवित्र स्नान आणि संत निवृत्तिनाथांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. थंडीची तमा न बाळगता वारकरी भाविक भक्तीरसात न्हाऊन निघाले. ठिकठिकाणी दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी सुरू असलेली कीर्तने, प्रवचने आणि भारुडांमुळे अवघी त्र्यंबकनगरी भक्तीच्या महापुरात न्हाऊन निघाली. भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थान आणि स्थानिक प्रशासनाने चोख नियोजन केले आहे..Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करा.संक्रांत आणि पौष वैद्य एकादशी आल्याने यंदा निवृत्तिनाथ महाराज यात्रेनिमित्त योग जुळून आला. सोमवार (ता. १२)पासूनच दिंड्यांचे आगमन सुरू झाले असून, मंगळवारी (ता. १३) पहाटेपासून त्र्यंबकनगरीमध्ये भाविकांची गर्दी झाली होती. एकादशीला मंदिर परिसरात भजनसेवा सादर केली. त्यानंतर श्रीनिवृत्तिनाथ महाराज रथोत्सव व नगर परिक्रमा दुपारी ४ वाजेनंतर निघाली. पुढे श्रीत्र्यंबकराज भेट व कुशावर्त तीर्थस्थान झाले..पौष वारी यात्रोत्सवात ह.भ.प. रमेश महाराज एनगांवकर, ह.भ.प. मोहन महाराज बेलापूरकर, श्री मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर यांची कीर्तनसेवा झाली. गुरुवारी (ता. १५) जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वंशज व देहूकर फडाचे प्रमुख (श्रीक्षेत्र पंढरपूर) ह.भ.प. बाळासाहेब महाराज देहूकर यांचे व ह.भ.प. डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांचे आज कीर्तन आहे. त्रयोदशी (ता. १६) रोजी कान्होबा महाराज देवकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेनिमित्त शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी (ता. १४) पहाटे त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिरात सपत्नीक शासकीय महापूजा केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.