Dr. Dhanraj Undirwade Agrowon
ॲग्रो विशेष

Mustard Production : मोहरी उत्पादक शेतकऱ्यांनी उद्योजक व्हावे : डॉ. उंदीरवाडे

Dr. Dhanraj Undirwade : पिकाच्या माध्यमातून मोहरी उत्पादकांनी उद्योजक व्हावे,’’ असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी केले.

Team Agrowon

Akola News : ‘‘मोहरी हे महत्त्वाचे तेलबियावर्गीय पीक आहे. रब्बी हंगामात विदर्भात सुद्धा हळूहळू मोहरीचे क्षेत्र वाढताना दिसते आहे. शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होत आहे, या पिकाच्या माध्यमातून मोहरी उत्पादकांनी उद्योजक व्हावे,’’ असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत नागपूर येथील कृषी महाविद्यालयाच्या पुढाकाराने राबविले जात असलेल्या अखिल भारतीय समन्वित जवस व मोहरी संशोधन प्रकल्पांतर्गत मोहरी संशोधन संचालनालय (भरतपूर-राजस्थान) मार्फत मोहरी पिकाचे प्रथम रेषीय प्रात्यक्षिक बाळापूर तालुक्यामधील कासारखेड येथील किरण हुसे यांच्या शेतात घेतले.

यानिमित्ताने आयोजित मोहरी पीक शेतीदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, जवस पैदासकार डॉ. बिना नायर, मोहरी पैदासकार डॉ. संदीप कामडी (नागपूर), आत्मा तालुका व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

उत्तर भारतात मोहरीचे तेल मानवी वापरासाठी, केसांच्या वाढीसाठी तसेच औषधी इतर बाबींसाठी वापर होतो. साबण उद्योगात वंगणासाठी खनिज तेलांसह वापरले जात असल्याने विदर्भातील शेतकऱ्यांनीही ही संधी मानून प्रक्रिया उद्योगाकडे वळावे, उद्योजक व्हावे अशी अपेक्षा डॉ. उंदीरवाडे यांनी व्यक्त केली. हुसे यांनी मोहरी पिकाचे एकरी नऊ क्विंटल उत्पादन घेतल्याबद्दल त्यांचा मान्यवरांनी सत्कार केला.

डॉ. इंगळे यांनी शेतकऱ्यांना कृषी विभाग व आत्मा यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. डॉ. नायर यांनी तेलबियांचे उपयोग सांगितले. डॉ. कामडी यांनी शेतकऱ्यांना मोहरीचे अधिकाधिक उत्पादन घेण्याची त्रिसूत्री लागवड पद्धत सांगितली.

कार्यक्रमासाठी कृषी साहाय्यक गोपाल राऊत, एम. बी. राठोड यांनी पुढाकार घेतला. शरद भुरे यांनी सूत्रसंचालन करीत आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Inspiring Farmer Story: जीवनात ही घडी अशीच राहू दे

Pusad Tree Dispute : ‘ते’ झाड रक्तचंदनाचे नसून बीजासालाचे

Indian Politics: शक्ती परीक्षेची उत्कंठा

Bamboo Project India : बांबू आधारित उद्योगासाठी चार हजार कोटींचा प्रकल्प

Mango Orchard Management : अतिघन आंबा बागेतील व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT