Mustard Cultivation : मोहरी लागवडीचे तंत्र

Mustard Crop Benefits : मोहरी बियांमध्ये ३२ ते ४० तेलाचे प्रमाण असून हे मानवी शरीरास गुणकारी आहे. मोहरीच्या हिरव्या कोवळ्या पानाची भाजी आरोग्याला उत्तम असते.
Mustard Crop
Mustard CropAgrowon

डॉ. संदीप कामडी, डॉ. बीना नायर

मोहरी बियांमध्ये ३२ ते ४० तेलाचे प्रमाण असून हे मानवी शरीरास गुणकारी आहे. मोहरीच्या हिरव्या कोवळ्या पानाची भाजी आरोग्याला उत्तम असते. मोहरीमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशिअम, जीवनसत्त्व अ आणि जीवनसत्त्व क मोठ्या प्रमाणात आहे. मोहरीच्या ढेपेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असून दुधाळ जनावरांसाठी उपयुक्त आहेत. या पिकाला कमी ओलित (२ ते ३ पाण्याच्या पाळ्या) लागते. गावठी तसेच रानटी जनावरे या पिकाला सहसा खात नाहीत. तसेच रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असतो.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पूर्व विदर्भात भात पिकानंतर कमी कालावधीत तसेच कमी उत्पादन खर्चात येणारे मोहरी हे एक उपयुक्त पीक आहे. भात पीक निघाल्यानंतर पूर्व विदर्भातील शेतकरी रब्बी पिके पारंपरिक पद्धतीने घेतात. त्यामुळे शेतात रोपांची योग्य संख्या रहात नाही. कुठे दाट तर कुठे विरळ होते, त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. मोहरीची पेरणी करताना शेतकरी अजूनही स्थानिक जातींचा वापर करतात. एकरी २ ते ३ किलो बियाणे वापरतात, अयोग्य व्यवस्थापनामुळे पीक उत्पादनात घट होते. हे लक्षात घेऊन सुधारित तंत्राने मोहरी लागवडीचे नियोजन करावे.

Mustard Crop
Flower Market : झेंडू फुलांच्या विक्रीत पदरी निराशा; अनेक उत्पादकांचा निघाला नाही खर्च

लागवडीचे तंत्र

पेरणी १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरच्या दरम्यान करावी. वेळेत पेरणी करण्याकरिता भात पीक काढल्यानंतर लगेच शून्य मशागत यंत्राच्या साहाय्याने किंवा पेरणी यंत्राने लागवड करावी. योग्य वेळी पेरणी केल्यामुळे बियाणे उगवण होण्यासाठी आवश्यक ओलावा मिळतो. रोपांची संख्या चांगली राहिल्याने उत्पादनात वाढ होते.

Mustard Crop
Sugarcane FRP : ‘नॅचरल’कडून उसाची पहिली उचल, अंतिम दर अव्वल राहील

हेक्टरी अडीच किलो बियाणे आवश्यक आहे. पेरणी करतेवेळी एक किलो बियाण्यांमध्ये तीन किलो माती/ वाळू मिसळून पेरणी करावी. असे केल्याने समप्रमाणात बियाणे पेरले जाते. यामुळे चांगल्या उत्पादनासाठी आवश्यक रोपांची संख्या राहाते.चांगल्या उत्पादनाकरिता कीड आणि रोगास प्रतिकारक जातींची निवड करावी. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मोहरीची टीएएम १०८-१ ही जात विकसित केली आहे.

बागायती क्षेत्रात लागवड करताना प्रति हेक्टरी ५० किलो नत्र, ४० किलो स्फुरद ही रासायनिक खताची मात्रा द्यावी. लागवडीअगोदर जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे. खत मात्रा माती परिक्षणानुसार द्यावी. पिकाला तीन वेळा पाणी देणे शक्य असले तर २५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. दोन वेळा पाणी देणे शक्य असेल तर पीक फुलोऱ्यात असताना आणि शेंगा भरताना द्यावे. एकदाच पाणी देणे शक्य असेल तर फुलोऱ्यात पाणी द्यावे.

डॉ. संदीप कामडी,

९४२३४२१५६७

(अखिल भारतीय समन्वित जवस व मोहरी संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, नागपूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com