Mustard MSP : मोहरीचे दर हमीभावाच्या खाली गेल्यास खरेदी सुरू करू: मुंडा

Price of Mustard Oil : केंद्र सरकारने रब्बी हंगामात पीएसएस अंतर्गत मोहरी खरेदीसाठी तयारी केल्याचे मुंडा यांनी म्हटले आहे. तसेच केंद्र सरकारसाठी शेतकऱ्यांचे हित सर्वोपरी असून मोहरीचा भाव एमएसपीच्या खाली गेल्यास सरकार एमएसपीनुसार खरेदी करेल. यासाठी आवश्यक व्यवस्था सरकारकडून करण्यात आली आहे, असा दावाही मुंडा यांनी केला.
Price of Mustard
Price of Mustard Agrowon

Pune News : मोहरीचे पडणाऱ्या भावावरून केंद्र सरकाने पावले उचलल्याचे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटले आहे. मोहरीचा भाव किमान आधारभूत किमतीच्या (MSP) खाली गेला तर सरकार शेतकऱ्यांकडून हमीभावानुसार खरेदी करण्यात येईल, असं आश्वासन मंत्री मुंडा यांनी दिलं आहे. 

देशातील शेतकऱ्यांना संकंटात ढकलण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. यामुळे देशातील शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान हमीभाव (एमएसपी) कायदा करण्यासह इतर मागण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्त्वात शेतकरी दिल्लीत धडक देणार आहेत. दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी, मोहरीचा भाव किमान आधारभूत किमतीच्या (MSP) खाली गेला तर सरकार योग्य पावले उचलेल असे म्हटले आहे. त्यासाठी सरकारने तयारी केली असून शेतकऱ्यांकडून हमीभावानुसार मोहरी खरेदी करेल, असेही मुंडा यांनी एका निवेदनात म्हटले आहे. 

Price of Mustard
Agrowon Podcast : हरभऱ्याला बाजार समित्यांमध्ये आज काय भाव मिळाला?

"केंद्र सरकारने रब्बी हंगामात पीएसएस अंतर्गत मोहरी खरेदीसाठी तयारी केल्याचे मुंडा यांनी म्हटले आहे. तसेच केंद्र सरकारसाठी शेतकऱ्यांचे हित सर्वोपरी असून मोहरीचा भाव एमएसपीच्या खाली गेल्यास सरकार एमएसपीनुसार खरेदी करेल. यासाठी आवश्यक व्यवस्था सरकारकडून करण्यात आली आहे, असा दावाही त्यांनी केला. 

Price of Mustard
Bharat Brand : केंद्र सरकारला शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांची काळजी; शेतमालाचे भाव पाडण्याचा नवा डाव!

याचबरोबर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी केंद्रीय नोडल एजन्सींना पीएसएसतंर्गत मोहरी खरेदीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर रब्बी हंगाम-२०२३ दरम्यान, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि आसाम या राज्यांमधून किमान आधारभूत किमतीनं २८.२४ लाख टन मोहरी खरेदीसाठी मंजूर करण्यात आल्याची माहिती मुंडा यांनी दिली आहे. 

रब्बी हंगाम २०२४ साठी देखील, सर्व मोहरी उत्पादक राज्यांना मोहरीचा दर हमीभावापेक्षा खाली गेल्यास पीएसएस अंतर्गत मोहरी खरेदीचा प्रस्ताव पाठवा ,अशा सुचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. रब्बी हंगाम-२०२४ साठी मोहरीचा हमीभाव ५ हजार ६५० रुपये प्रति क्विंटल आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com