Computer Center  Agrowon
ॲग्रो विशेष

Computer Center : प्रत्येक जिल्ह्यात होणार बहुउद्देशीय संगणक केंद्र

Multi-Purpose Computer Center : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ५० ते १५० संगणक आसन क्षमता असणारे ई-वाचनालय व अभ्यासिका यांचा समावेश असलेले बहुउद्देशीय संगणक केंद्र स्थापन करण्याकरिता २८ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ५० ते १५० संगणक आसन क्षमता असणारे ई-वाचनालय व अभ्यासिका यांचा समावेश असलेले बहुउद्देशीय संगणक केंद्र स्थापन करण्याकरिता २८ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे. त्याला शालेय शिक्षण विभागाकडून मान्यता मिळालेली आहे.

राज्यातील शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होण्यासाठी, त्याचबरोबर ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन प्रशिक्षण ऑनलाइन मूल्यमापन या बाबींसाठी डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या हेतूने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बहुउद्देशीय संगणक केंद्र स्थापन करण्यासाठी एकूण ६० कोटी रुपये इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता शासन निर्णयान्वये दिली होती. ‘स्टार्स’ या प्रकल्पाच्या २०२३-२४ मधील मंजूर तरतुदीमधून हा खर्च भागविणार आहे.

परिषदेमार्फत बहुउद्देशीय संगणक केंद्र उभारणीसाठी जेम पोर्टलवर ई-निविदा प्रक्रिया राबविली असून, प्रकल्पासाठी एकूण ४९ कोटी ९८ लाख इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती राज्य प्रकल्प संचालक यांनी शासनास केली आहे.

या अनुषंगाने २०२३-२४ च्या उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतुदींमधून उपलब्ध निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सद्य:स्थितीत उपलब्ध निधीनुसार, २८ कोटी इतका निधी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेस वितरित करण्यास मान्यता दिली असून, उर्वरित २१ कोटी ९८ लाख रुपये इतका निधी देणार आहे.

शालेय शिक्षण विभागातील सहसचिव यांना नियंत्रक अधिकारी व कक्ष अधिकारी (रोख शाखा) यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Commodity Prices: ‘एल निनो’मुळे शेतीमालाच्या भावात सुधारणा

Punjab Assembly Election: पंजाबातील तिरंगी संघर्षाची नेपथ्यरचना

Soybean Germination Failure: कायद्याच्या बडग्यानेच गुणवत्ता नियंत्रण

Milk Adulteration Controversy: दूध भेसळीवर आवाज न उठवल्याबद्दल वळसे पाटील यांनी राजीनामा द्यावा : निकम

Milk Adulteration Control System: दूध भेसळीला आतापर्यंत आळा का बसला नाही?च पूर्वीच्या यंत्रणेवर शेतकऱ्यांचे प्रश्‍नचिन्ह

SCROLL FOR NEXT