Natural Farming
Natural Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Natural Farming : नैसर्गिक पद्धतीने विकसीत केली बहुस्तरिय पीक पद्धत

Team Agrowon

कमी उत्पादनखर्च, अधिक नफा म्हणजेच नैसर्गिक शेती. स्वस्त, सुटसुटीत आणि जागतिक तापमानवाढीचा मुकाबला करू शकेल अशी झीरो बजेट शेती म्हणजेच नैसर्गिक शेती अधिक उपयुक्त मानली जात आहे. रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीची सुपिकता आणि उत्पादकता घटत आहे. यावर नैसर्गिक शेती हा पर्याय ठरु शकेल. नैसर्गीक पद्धतीनं जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढवून जमिनीची सुपीकता व जमिनीतील प्रमाण वाढवता येते, मग रासायनिक खतांची गरज भासत नाही. रासायनिक खते हेच काम करतात. पण, त्याचे दुष्परिणाम आहेत. त्यामुळं आज जगभरात नैसर्गिक शेतीचं महत्त्व वाढलयं. 

उत्तरप्रदेशातील लखनौ जिल्ह्यातील मलिहाबाद गावातील गिरजा शंकर मौर्या या ३४ वर्षीय शेतकऱ्याने नैसर्गिक शेतीचा उत्तम नमुना तयार केला आहे. एक एकर क्षेत्रावर साधारणपने १ ते २ पिके घेता येतात पण गिरजा एक एकरपेक्षा कमी जमिनीवर १२ पिके घेत बहुस्तरिय पीक पद्धतीचे मॉडेल विकसीत केले आहे . ही पिके घेत असाताना जमिनीची सुपिकताही राखली जाईल याप्रमाणे पीक लागवडीचे नियोजन केलं जातं. गिरजा यांनी नैसर्गीक शेतीचे अभ्यासक पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्याकडून नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण घेतलं आहे. गिरजा शंकर मौर्या यांना आतापर्यंत नैसर्गिक शेती क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. 

गिरजा बहुस्तरीय शेती करतात. शेतीची दोन भागात विभागणी केली आहे. एका भागात ४ ते ५ पिकं घेतली जातात आणि दुसऱ्या भागात १२ ते १४ पिकं घेतली जातात. उडीद, हळद, तूर ही धान्य पिके तर आंबा, पेरू, केळी, पपई यासारख्या फळझाडांचीही त्यानी लागवड केली आहे. घरच्या जनावराच्या चाऱ्याची गरज भागविण्यासाठी नेपिअर गवताची लागवड केलेली आहे. भाजीपाला पिकामध्ये परवल, कुंद्रू, धणे, तरोई, भोपळा या पिकांचा समावेश आहे. याशिवाय शेतांच्या बांधावर मनोकामिनी या शोभिवंत झाडांची लागवड केली आहे. मनोकामिनी ची झाडं जनावरे खात नाहीत. ही झाडे नैसर्गिक सीमा म्हणून कार्य करतात. या झाडांचा उपयोग फुलांच्या सजावटीसाठी केला जातो. त्याची स्वतंत्रपणे विक्री करता येते. या झाडांमुळे शेतात किड रांगांना अटकावही होतो.  

लखनौ येथील भीमराव आंबेडकर विद्यापीठात झालेल्या कार्यशाळेत गिरिजा शंकर यांनी पद्मश्री पुरस्कार विजेते सुभाष पालेकर यांच्याकडून २०१७ मध्ये 'झिरो बजेट फार्मिंग प्रिन्सिपल'चे प्रशिक्षण घेतले. याशिवाय लखनौच्या कृषी विज्ञान केंद्र, भारतीय कृषी संशोधन परिषद आणि कृषी विभागाच्या ऊस संशोधन संस्थेकडून तांत्रिक सहकार्य घेतले. मगच त्यानी शेतीला सुरुवात केली. गेल्या वर्षी बहुस्तरीय पीक पद्धतीतून गिरिजा यांना गेल्यावर्षी ०.४० एकर क्षेत्रातून दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्याचबरोबर त्यांना ०.८ एकर क्षेत्रातून साडेतीन लाख रुपये उत्पन्न  मिळाले. गिरिजा शंकर यांच्या मते नैसर्गिक शेतीत उद्योजकतेचा अवलंब करून एक हेक्टर जमिनीतून कमी खर्चात दरमहा सुमारे ६० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवता येतो.

गिरजा यांना कृषी क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे त्यांना 'संपूर्ण स्वदेशी सन्मान' प्रदान करण्यात आला. इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चर (रहमान खेरा, लखनौ) या संस्थेने त्यांना प्रगतिशील शेतकरी पुरस्काराने सन्मानित केले. भारतीय ऊस संशोधन संस्थेने नैसर्गिक शेतीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा गौरव केला आहे.

नैसर्गिक शेतीचा विस्तार करण्यासाठी गिरिजा शंकर गावात ग्राम संसद आणि ग्राम उत्सवासारखे कार्यक्रम आयोजित करतात. यामध्ये त्यांना गावचे प्रमुख विजय लक्ष्मी यांचेही सहकार्य मिळते. गिरजा शंकर नैसर्गिक बहुस्तरिय शेतीतील आपला अनुभव आणि प्रयोग प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आणि उत्पन्नवाढीसाठी राष्ट्रीय गाय उत्पादक संघटनेशी ते एकजूट आहेत. लखनौ जिल्ह्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांना ते स्वावलंबनाचे धडे देतात. आपल्या शेतातील उत्पादनांवर प्रक्रिया करून आपल्या ग्राहकांना शुद्ध, विषमुक्त पौष्टिक आहार मिळावा यासाठी तो दर आठवड्याला शहराच्या प्रत्येक भागात पोहोचवितात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT