Mukund Pingale Agrowon
ॲग्रो विशेष

Dadasaheb Potnis Award: मुकुंद पिंगळे यांना दादासाहेब पोतनीस पुरस्कार

Agrowon Journalist Mukund Pingale: ‘ॲग्रोवन’चे नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुकुंद पिंगळे यांना दादासाहेब पोतनीस पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण व कृषी क्षेत्रातील सकारात्मक आणि प्रयोगशील पत्रकारितेसाठी राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून हा सन्मान दिला जातो.

Team Agrowon

Mumbai News: महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे दिला जाणारा २०२० या वर्षाचा नाशिक विभागीय पोतनीस पत्रकारिता पुरस्कार ‘अॅग्रोवन’चे नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुकुंद पिंगळे यांना जाहीर करण्यात आला आहे.रोख ५१ हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय दहा हजार रुपये ‘गावकरी’ने पुरस्कृत केले आहेत.

पिंगळे हे गेल्या दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, सहकार, पणन, सहकार, ग्रामविकास, वन, जलसंपदा, जलसंधारण, स्वच्छता व पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण व महिला सक्षमीकरण यासंबंधीचे त्यांचे विशेष वार्तांकन व यशोगाथा प्रसिद्ध झाल्या आहेत. सकारात्मक लेखणीद्वारे इतर शेतकऱ्यांना शेतीत प्रयोग करण्याची प्रेरणा त्यांच्या लिखाणातून मिळाली आहे.

कृषी क्षेत्रात फलोत्पादन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, कृषी पर्यटन, मत्‍स्यव्यवसाय, मधमाशीपालन, मशरूम उत्पादन, रेशीम शेती दूधप्रक्रिया यांसारख्या पूरक व्यवसायांसह, ग्रामविकास आदी घटकांवर यशोगाथांचे लेखन केलेले आहे.

यांसह कृषी व संलग्न क्षेत्रातील मंत्री, धोरणकर्ते, अभ्यासक व मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आहेत. शेतीमाल निर्यात, कांदा प्रश्‍न, पीकविमा, पीककर्ज, हवामान, मजूरटंचाईचे प्रश्‍न यांसह कृषी संशोधन या विषयावर सातत्याने लेखन करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Fruit Drop: डाळिंबातील फुलगळीची कारणे काय?

Farmers Issues: दोन लाखांच्या मर्यादेमुळे फळबागधारक कर्जमाफीपासून वंचित

PM POSHAN Shakti: कागदावर पौष्टिक मेनू; प्रत्यक्षात साधी खिचडी !

Agriculture Expo: के. के. वाघ कृषी महोत्सवात फलोत्पादनाचे ‘लाईव्ह प्लॉट्स’

Chia Cultivation: पूर्व विदर्भात ‘चिया’ लागवडीला चालना

SCROLL FOR NEXT