Co-Operative Department
Co-Operative DepartmentAgrowon

Maharashtra Co-operative Awards: सहकार पुरस्कारांसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर

Maharashtra Cooperative Institutions : राज्यातील सहकार क्षेत्रातील कार्यरत संस्थांना गौरविण्यासाठी ‘सहकार महर्षी’, ‘सहकार भूषण’ आणि ‘सहकार निष्ठ’ या गटांत एकूण ४५ संस्थांची निवड होणार असून, प्रस्ताव पाठवण्याची अंतिम तारीख १८ जुलै आहे.
Published on

Pune News: राज्याच्या सहकार चळवळीच्या विकासात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या सहकारी संस्थांना राज्य शासनामार्फत सहकार पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील कामगिरीच्या आधारावर सहकारी संस्थांची निवड करण्याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सहकारी संस्थांनी १८ जुलैपर्यंत संबंधित तालुका सहायक निबंधक, उपनिबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी केले आहे.

या पुरस्कारांतर्गत ‘सहकार महर्षी’ पुरस्कार-१, ‘सहकार भूषण’- २१ तसेच ‘सहकार निष्ठ’- २३ असे एकूण ४५ संस्थांना पुरस्कार देण्यात येणार असून, अनुक्रमे रुपये १ लाख, रुपये ५१ हजार व २५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

Co-Operative Department
Maharashtra Agri Awards: कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव अधिकाऱ्यांनीच ठेवले दाबून

पात्र संस्थांच्या निवडीसाठी संस्था प्रकारनिहाय नोंदणी, वार्षिक सर्वसाधारण सभा, संचालक मंडळ सभा, नफा-तोटा, थकबाकी, संस्थेवरील कायदेशीर कारवाई, लेखापरीक्षण, व दोषदुरुस्ती अहवाल, निवडणूक, व्यवस्थापन, निधीची गुंतवणूक, प्रशिक्षण, सादर करावयाची प्रतिज्ञापत्रे यासाठी ५० गुण, संस्था प्रकारनिहाय निश्‍चित केलेल्या विशेष निकषांसाठी ३५ गुण व सहकारी संस्थेसाठी योगदान,

Co-Operative Department
Vasantrao Naik Awards: वसंतराव नाईक कृषी पुरस्कार जाहीर

जनतेसाठी दिलेले योगदान, सहकार चळवळीच्या विकासासाठी प्रयत्न, सहकारी, सार्वजनिक, धर्मादाय प्रयोजनासाठी केलेली मदतीसाठी २० गुण देण्यात येणार आहेत.
शासन स्तरावरील समितीमार्फत २६ सप्टेंबरपर्यंत पुरस्कार प्राप्त संस्थांची अंतिम निवड करण्यात येणार आहे.

पुरस्काराविषयी अधिक माहिती सहकार विभागाच्या http://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच सर्व जिल्हा उपनिबंधक, तालुका उपनिबंधक, सहायक निबंधक यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणी झालेल्या इच्छुक सहकारी संस्थांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दाखल करावेत, असे आवाहन सहकार विभागामार्फत करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com