Soybean Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

MSP Procurement : हमीभावाने उडीद, मूग, सोयाबीनची खरेदी

Soybean MSP : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने मूग, उडीद व सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

Team Agrowon

Jalana News : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने मूग, उडीद व सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात अकरा ठिकाणी हे खरेदी केंद्र स्थापन करण्यात आली असून, पिकांची ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे.

हंगाम २०२४-२५ मध्ये जिल्ह्यात केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने खरीप हंगामातील मूग आठ हजार ६८२, उडीद सात हजार ४०० व सोयाबीन चार हजार ८९२ प्रतिक्विंटलप्रमाणे खरेदी केले जाणार आहेत.

त्यासाठी या तीन पिकांची ऑनलाइन नोंदणीकरिता पणन महासंघाने जिल्ह्यात अकरा ठिकाणी केंद्र सुरू केले आहेत. यामध्ये अंबड तालुका खरेदी विक्री संघ, सेंटर अंबड, जडाई फार्मर्स प्रोड्युसर कंपनी रेवगाव सेंटर जालना, मे. पूर्णा केळणा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी बरंजळा सेंटर भोकरदन, नानसी शेतकरी धान्य अधिकोष बहुउद्देशीय सहसंस्था नानसी सेंटर मंठा, ॲग्रीटच फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. धोंडखेडा सेंटर माहोरा, श्री एकवीरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सेंटर बदनापूर,

श्री गणेश कृषी उपयोगी साहित्य पुरवठा शेती सह संस्था सेंटर परतूर, जीवरेखा ॲग्री प्रोड्युसर कंपनी लि. गणेशपूर सेंटर जाफराबाद, वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्या. जानेफळ सेंटर अन्वा, वैष्णवी अभिवन सहकारी संस्था मर्या. जवखेडा खुर्द सेंटर राजूर (जवखेडा खुर्द), हर्षवर्धन कृषीविकास प्रोड्युसर कंपनी मर्या. लोणी सेंटर आष्टी या खरेदी केंद्रांचा समावेश आहे.

नोंदणीसाठी ही कागदपत्रे आवश्यक

शेतकऱ्यांनी मूग, उडीद व सोयाबीन पिकांची खरेदीकरिता पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी आधारकार्ड, सातबारा उतारा, नमुना आठ अ, चालू वर्षाच्या सातबारावर पीकपेरा नोंद असावी. बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत ही कागदपत्रे घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी विजय राठोड यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT