Banana Farm Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Cultivation : खानदेशात मृग बहर केळी लागवडीस गती

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मृग बहरातील केळी लागवड या महिन्यात गतीने सुरू आहे. अर्ली केळी लागवड रावेरात गेल्या महिन्यातच झाली आहे. यंदा केळी लागवड खानदेशात वाढू शकते, अशी स्थिती आहे.

केळीचे दर यंदा टिकून होते. फक्त या महिन्यात दर कमी अधिक झाले. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. पण केळीला चांगला पर्याय कृत्रीम जलसाठाधारकांकडे नाही. यामुळे केळी लागवड कायम आहे. यंदा ती वाढू शकते. यंदा मार्च ते मेच्या मध्यापर्यंत दर्जेदार केळीला चांगला उठाव होता. कांदेबाग केळी व मृग बहर केळीचे उत्पादनही बऱ्यापैकी आले. जळगाव जिल्ह्यात मृग बहर केळीची काढणी मार्च अखेरीस सुरू झाली.

तर कांदेबाग केळीची काढणी दसरा सणापासून सुरू होत असते. सध्या मृग बहर व पिलबाग केळीची काढणी रावेर, नंदुरबारमधील अक्कलकुवा, शहादा, तळोदा भागात सुरू आहे. या केळीला किमान ६०० व कमाल १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. मृग बहर केळीची लागवड मे महिन्यात सुरू होते.

अर्ली लागवड मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केली जाते. तर नियमीत लागवड जूनपासून सुरू होते. कांदेबाग केळीची लागवड जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, पाचोरा, जामनेर भागात केली जाते. तर मृग बहर केळीची लागवड जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागात केली जाते. केळी लागवडीसाठी मजुरांची व्यवस्था करावी लागत आहे. मजूरटंचाईचा फटका काही भागात बसत आहे.

४२ ते ४३ हजार हेक्टरवर लागवडीची शक्यता

रोपांच्या किंवा उतिसंवर्धित केळी रोपांच्या लागवडीसाठी चांगले नियोजन करून घ्यावे लागते. यंदा खानदेशात मृग बहरातील केळीची एकूण लागवड ४२ ते ४३ हजार हेक्टरवर होऊ शकते. लागवड आणखी २० ते २५ दिवस सुरू राहील, अशी माहिती मिळाली. अनेक शेतकरी सातमासी, आंबेमोहोर, महालक्ष्मी आदी केळी वाणांचा उपयोग केळी लागवडीसाठी करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : शिरूरमधील शेतकऱ्यांचे वादळ, पावसामुळे पिकांचे नुकसान

Maharashtra Politics : छत्रपती शिवरायांचे विचार घेऊनच काँग्रेसचा लढा

Neera Karha Upsa Irrigation Scheme : बारामतीचा जिरायत शिक्का पुसणार

Agriculture Input Subsidy : निविष्ठांचे अनुदान मिळण्यासाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस

Bioplastic Production : ‘बायो प्लॅस्टिक’ चे उत्पादन वाढविणे काळाची गरज

SCROLL FOR NEXT