Banana Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Cultivation : खानदेशात उशिराची मृग बहर केळी लागवड सुरूच

Banana Production : खानदेशात मृग बहरातील उशिराची केळी लागवड सुरूच आहे. अर्ली केळी लागवड रावेरात गेल्या महिन्यातच झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मृग बहरातील उशिराची केळी लागवड सुरूच आहे. अर्ली केळी लागवड रावेरात गेल्या महिन्यातच झाली आहे. यंदा केळी लागवड खानदेशात वाढू शकते, अशी स्थिती आहे. केळीचे दर यंदा टिकून होते. या महिन्यात आणखी वधारले झाले. केळीला चांगला पर्याय कृत्रीम जलसाठाधारकांकडे नाही. यामुळे केळी लागवड कायम आहे.

यंदा ती वाढू शकते. यंदा मार्च ते मेच्या मध्यापर्यंत दर्जेदार केळीला चांगला उठाव होता. पण या काळात दर कमी होते. कांदेबाग केळी व मृग बहर केळीचे उत्पादनही बऱ्यापैकी आले. जळगाव जिल्ह्यात मृग बहर केळीची काढणी मार्च अखेरीस सुरू झाली. तर कांदेबाग केळीची काढणी गणेशोत्सव, दसरा सणापासून सुरू होत असते.

सध्या पिलबाग, अर्ली कांदेबाग केळीची काढणी रावेर, यावल, चोपडा, पाचोरा, भडगाव, नंदुरबारमधील अक्कलकुवा, शहादा, तळोदा भागात सुरू आहे. या केळीला किमान २००० व कमाल २६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे.

मृग बहर केळीची लागवड मे महिन्यात सुरू होते. अर्ली लागवड मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केली जाते. तर नियमीत लागवड जूनपासून सुरू होते. खानदेशात मृग बहर केळीखालील क्षेत्र अधिक असते. तर कांदेबाग केळीखालील क्षेत्र कमी असते.

कांदेबाग केळीची लागवड जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, पाचोरा, जामनेर भागात केली जाते. तर मृग बहर केळीची लागवड जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागात केली जाते. केळी लागवडीसाठी मजुरांची व्यवस्था शेतकऱ्यांना करावी लागत आहे.

मजूरटंचाईचा फटका काही भागात बसत आहे. रोपांच्या किंवा उतिसंवर्धित केळी रोपांच्या लागवडीसाठी चांगले नियोजन करून घ्यावे लागते. यंदा खानदेशात मृग बहरातील केळीची एकूण लागवड ४२ ते ४३ हजार हेक्टरवर होवू शकते. लागवड आणखी १० ते १५ दिवस सुरू राहील, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT