Omraje Nimbalkar Agrowon
ॲग्रो विशेष

Omraje Nimbalkar News : खा. निंबाळकर आणि आ. पाटील यांचं महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन!

Omraje Nimbalkar & Kailas Patil : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी शुक्रवारी (ता.३१) महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं.

Dhananjay Sanap

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात विजेच्या लपंडावानं शेतकरी वैतागलेत. दुष्काळामुळं जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विहीरी आणि बोअरवेल्स उपशावर आलेत. एकदा उपसा केल्यानंतर पुन्हा पाणी येण्यासाठी दिवसभर वाट पाहावी लागते.

त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी वेळेवर वीजपुरवठा करण्यात येत नसल्याची तक्रार शेतकरी करतात. पण महावितरणकडे तक्रार केली तरी दखल घेतली जात नाही. त्यामुळे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी शुक्रवारी (ता.३१) महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं.

"महावितरणचे कर्मचारी शेतकऱ्यांशी उद्धटसारखं बोलतात. त्यामुळं शेतकऱ्यांचे आम्हाला सतत फोन येतात. महावितरणचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडवणार नाहीत, तोवर आम्ही इथेच बसून राहू," अशी भूमिका निंबाळकर यांनी घेतली होती. तसेच कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना फैलावर घेतलं.

यावेळी महावितरणचे कर्मचारी कार्यालयीन वेळ पाळत नाहीत, असंही चित्र पाहायला मिळालं. राज्यात वीज प्रश्न कायम चर्चेत असतो. भारनियमनामुळे शेतकरी जेरीस आलेत. त्यात दुष्काळाचा तडाखा शेतकऱ्यांना बसतोय.

खासदार निंबाळकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्या सांगितल्या. ते म्हणाले, "आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांचे फोन उचला, अशा सूचना करण्यास सांगितलं होतं. पण तरीही आचारसंहितेत कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचे फोन घेतले नाहीत." असंही निंबाळकर म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biochar Production: कर्ब संवर्धनासाठी पीक अवशेषांपासून बायोचार निर्मिती

Turmeric Farming: हळद, आले पिकांतील अन्नद्रव्ये व्यवस्थापन 

Armyworm in Maize: मक्यातील लष्करी अळीचा करा नायनाट; कीड व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती

Great Indian Bustard: माळढोक अभयारण्याच्या राखीव क्षेत्रात सोडले घातक रसायन 

Lumpy Disease: मोहोळमध्ये ‘लम्पी स्कीन’ने दोन जनावरांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT