Ber Market Agrowon
ॲग्रो विशेष

Ber Market : बाजारात संकरित बोरांची चलती

Ber Fruit Update : गावरान बोरे अलीकडच्या काळात दृष्टीआड होऊन संकरित व कलमी मोठ्या आकारांच्या बोरांनी सर्वत्र बोलबाला आहे. गावरान बोरांची चव दुर्मिळ झाली आहे.

Team Agrowon

Mumbai News : ग्रामीण भाग जंगल व्याप्त असल्याने आरोग्यवर्धक अशी निरनिराळ्या प्रकारची औषधी वनस्पती, वृक्ष, वेली, फळे, कंदमुळे सहज उपलब्ध होतात, मात्र जंगलतोडीमुळे हा रानमेवा कमी होत आहे.

थंडीच्या हंगामात रानमाळात मिळणारी आंबट, तुरट, गोड अशी स्वादिष्ट गावरान बोरांची चव निराळीच असते, मात्र ही गावरान बोरे अलीकडच्या काळात दृष्टीआड होऊन संकरित व कलमी मोठ्या आकारांच्या बोरांनी सर्वत्र बोलबाला आहे. गावरान बोरांची चव दुर्मिळ झाली आहे.

जव्हार परिसरात बहुसंख्य शेतकरी असल्याने शेतात बांधावर अथवा कुरणावर मोठ्या प्रमाणावर झाडे असायची. मात्र अलीकडे बांध लहान होत असल्याने अशी झाडे कमी होऊ लागल्यामुळे ही बोरे मिळणे कठीण झाले आहे.

त्यात यंदा रानमेवा कमी झाला असून त्यात बोरेही कमी झाली आहेत. गावरान बोरांची मजा या संकरित बोरांत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. पूर्वीच्या काळी गावासह शहरी भागांतही फक्त गावरान लहान आकाराची बोरे सर्वत्र मिळत असत; परंतु आता वेगवेगळ्या प्रकारच्या कलमी बोरांच्या जाती विकसित करण्यात आल्या, पण यात गावरान बोरांची चवच उरली नाही.

वृक्षतोडीचा परिणाम

पूर्वी बांधावर, शेतात बोरं, आंबा, बाभूळ, चिंच, सीताफळ आदी झाडे मोठ्या प्रमाणात होती. या सर्व झाडांचे शेतकऱ्यांकडून योग्य संगोपन केले जात असे; परंतु अलीकडे तुरळक ठिकाणी गावरान बोरांची झाडे दृष्टीस पडत आहेत. मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली गेली. यात गावरान बोरांचीही झाडे तोडून ती नष्ट करण्यात आली. त्यामुळे गावरान बोरांची चव दुर्मिळ बनत चालली असल्याचे चित्र आहे.

टपोऱ्या बोरांची सफरचंदाला टक्कर

तुर्भे : रंगाने हिरवट, पिवळसर, पण चवीला गोड असणाऱ्या अॅपल बोरची वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात आवक सुरू झाली आहे. सध्या या फळाची दररोज ३५० ते ४०० क्विंटल इतकी आवक होत असून सफरचंदासारखा आकार असल्याने लक्ष वेधत आहे.

बोर म्हटले की डोळ्यांसमोर काहीशी हिरवट आणि पिकल्यावर लाल भुरकट रंगाची लहान आंबट फळे येतात. मात्र, या व्यतिरिक्तही बाजारात सफरचंदाच्या आकाराची बोरे येत आहेत. सध्या बाजारात चण्यामण्या, उमराण, चमेली, चेकनेट बोरांच्या जाती आल्या आहेत. तसेच या बोरांमध्ये अधिक गर असल्याने मोठी मागणी आहे.

तुरीचा आधार

दोन-तीन वर्षांत तूरडाळीचे भाव सुमारे २५० ते ३०० रुपयांपेक्षाही जास्त झाले होते. आजही भाववाढ कायम आहे. नजीकच्या काळात भाव वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या महागाईच्या काळात शेतकऱ्यांना घरच्या घरी तूरडाळीचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

तूरडाळीतील पोषक घटकांमुळे या डाळीला मोठी मागणी आहे. आदिवासी तालुक्यात शेतकऱ्यांना खरीप, रब्बी हंगामात तूर, हरभरा, कडूवाल, उडीद आदी बियाण्यांचे मोफत वाटप करून पिके घेण्यास प्रोत्साहन दिले, तर भात पिकाला उत्तम पर्याय ठरून शकेल. तूर, हरभरा, वाल, उडीदचे उत्पादन करून रोजगारही मिळेल.

दर वर्षी आम्ही शेताच्या खाचरात किवा बांधावर खरीप हंगामात तूर पिकाची लागवड करतो. या पिकाला कमी खत लागते. त्याचप्रमाणे कीडरोगही कमी पडतात. त्यामुळे भातपिकाबरोबर तुरीचेही उत्पन्न दुबार पीक म्हणून घेता येते. तूरडाळीचा भाव बाजारात वाढला असला तरी घरची तूरडाळ मिळते.
माणिक गोपाळ सांबरे, शेतकरी, विक्रमगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT