VNMKV and Saguna Rural Foundation Agrowon
ॲग्रो विशेष

MOU of VNMKV and Saguna Rural Foundation: ‘वनामकृवि’ आणि सगुणा रुरल फाउंडेशनमध्ये सामंजस्य करार

VNMKV and Saguna Rural Foundation : परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने आणि रायगड येथील सगुणा रुरल फाउंडेशनने शिक्षण, संशोधन व प्रशिक्षणासाठी करार केला आहे. या भागीदारीमुळे नैसर्गिक शेती संशोधनाला गती मिळणार असून विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभवाची मोठी संधी निर्माण झाली आहे.

माणिक रासवे : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि नेरळ (ता. कर्जत, जि. रायगड) येथील सगुणा रुरल फाउंडेशन यांच्यामध्ये शिक्षण, संशोधन, प्रशिक्षण कार्यासाठी शुक्रवारी (ता. ३०) सामंजस्य करार करण्यात आला.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांच्या उपस्थितीत या करारावर विद्यापीठातर्फे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आणि सगुणा रुरल फाउंडेशनचे संस्थापक चंद्रशेखर भडसावळे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी विद्यापीठाचे संशोधन उपसंचालक डॉ. हरिहर कौसडीकर, डॉ. मदन पेंडके उपस्थित होते.

सगुणा रुरल फाउंडेशन संस्थेची देशभरात नैसर्गिक शेतीमध्ये नवोन्मेषी प्रयोगांसाठी ओळख आहे. या करारामुळे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सगुणा फार्म येथे प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. पदव्युत्तर तसेच आचार्य पदवीच्या संशोधनासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे.

विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सुद्धा सगुणा फार्मला भेटी देऊन विविध संशोधन उपक्रमांत सहभाग घेतील. संयुक्त संशोधन प्रकल्प तयार करून त्यांना बाह्य वित्तीय संस्थांकडून आर्थिक साह्य मिळवण्यासाठी सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी संशोधन आणि शेती क्षेत्रात नव्या संधी निर्माण होण्यास हातभार लागेल. या वेळी शेखर भडसावळे यांनी सगुणा फार्मच्या कार्याचा सविस्तर आढावा सादर केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion export India : कांद्याचे १५०, द्राक्षाचे ३०० कंटेनर अडकले; इराण आणि इस्रायल-अमेरिकेतील युद्धामुळे निर्यात ठप्प, शेतकरी व व्यापाऱ्यांना फटका

Gharkul Yojana: राज्यात एका वर्षात जवळपास ४ लाख घरकुले पूर्ण, हा आजपर्यंतचा विक्रम- जयकुमार गोरे

Poultry Farming: मुसळवाडीत कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाला महिलांचा प्रतिसाद

Farm Loan Waiver: थकबाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीबाबत कृषिमंत्री भरणेंची महत्त्वाची माहिती

Akot APMC: ‘एसआयटी’ चौकशीमुळे सहकार क्षेत्रात खळबळ

SCROLL FOR NEXT