MoU of MAFSU and Cardian Correct: ‘माफसू’ आणि ‘कार्डियन करेक्ट’ संस्थेचा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

Memorandum of Understanding: महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाने ‘कार्डियन करेक्ट’ इंटरनॅशनल फाउंडेशनसोबत पशुपालन व मत्स्यपालन क्षेत्रात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे.
Memorandum of Understanding
Memorandum of UnderstandingAgrowon
Published on
Updated on

Nashik News: पशुपालन विस्तार कार्यासाठी महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला. देशी गोवंश संवर्धन तसेच जनुकीय सुधारणा, लघू प्रशिक्षण केंद्राची स्थापना व व्यवस्थापन तसेच पशुधन आणि मत्स्यपालनाद्वारे ग्रामीण कृषी क्षेत्राचा विकास हे प्रमुख विषय सामंजस्य करारात प्रामुख्याने समाविष्ट आहेत.

‘माफसू’ची १६ वी विस्तार व निरंतर शिक्षण परिषद सभा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नागपूर येथील विद्यापीठाच्या सभागृहात झाली. या बैठकीला विस्तार शिक्षण परिषदेचे सदस्य सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री स्मीता कोल्हे, कृषी उद्योजक वासंती मंगरोळे, डॉ. महेश भोंडगे, प्रगतिशील कुक्कुटपालक रवींद्र मेटकर, प्रकाश लोणारे यांच्यासह विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने, संशोधन संचालक डॉ. एन. व्ही. कुरकुरे, डॉ. एस. व्ही. उपाध्ये यांच्यासह विद्यापीठाच्या राज्यभरातील १४ महाविद्यालयांचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता उपस्थित होते.

Memorandum of Understanding
Tapi Mega Project : तापी मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेशमध्ये करार

या वेळी बोलताना डॉ. पाटील म्हणाले, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, विद्यार्थ्यांनी पशुपालनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी संशोधन विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून बांधावर पोहोचावे. विद्यापीठाचे तयार झालेले पदवीधर दुधाळ जनावरे, कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्स्यपालन आदी क्षेत्रांत शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करतील, त्यासाठी सरकारला मदत करतील. त्यातून राष्ट्रीय सकल उत्पन्नात पशुपालनाच्या माध्यमातून भर पडेल. चांगल्या प्रतीची जनावरे, आधुनिक तंत्रज्ञान विद्यापीठाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. केंद्रीय संशोधन संस्थांचे तंत्रज्ञान विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी तळागाळातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Memorandum of Understanding
Memorandum of Understanding : जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत ४६६१ कोटींचे सामंजस्य करार

संस्थेचे विश्‍वस्त ऋत्विक पाळेकर, रवींद्र अमृतकर, शैलेश दरगुडे, श्रीनिवास कुलकर्णी, नरेंद्र अमृतकर, सौरभ येवला, स्वरूप पटेल, अभिजित वंजारी, दिनेश नाईक, अमर काटोले, संजय भुजबळ, पशुधन विकास अधिकारी डॉ. संतोष शिंदे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना संस्थेच्या माध्यमातून तांत्रिक मार्गदर्शन

देशी गोवंशाचे संवर्धन आणि जनुकीय सुधारणा हे शाश्‍वत कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘कार्डियन करेक्ट’ संस्था विद्यापीठाच्या मदतीने शेतकऱ्यांचे प्रबोधन, शाश्‍वत शेती सुधारणा, नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार विद्यापीठाच्या मदतीने आगामी काळात शेतकऱ्यांच्या गटाच्या माध्यमातून नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यांत करणार आहे. दुग्ध उत्पादन वाढ, परसबागेतील कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, मत्स्यसंवर्धन आदी माध्यमातून पूरक उत्पन्नाची साधने उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ शेतकऱ्यांना स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून तांत्रिक मार्गदर्शन करेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com