Wanrai Bunds  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Bund : रत्नागिरीत नदी, नाल्यांवर १२०० हून अधिक बंधारे

Water Shortage : यंदा पावसाने जेमतेम सरासरी गाठल्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ अधिक बसण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : यंदा पावसाने जेमतेम सरासरी गाठल्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ अधिक बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद स्तरावरून दिवाळीपूर्वीच सुरू केलेल्या मिशन बंधारे मोहिमेला गावपातळीवर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात नदी, नाल्यांवर १२०० हून अधिक बंधारे उभारण्यात आले आहेत. श्रमदानातून उभारलेल्या या बंधाऱ्यांमुळे शासनाच्या सुमारे ५० लाखांहून अधिक रुपये वाचले आहेत.

जिल्हा परिषदेकडून यंदा दसऱ्यापूर्वीच बंधारे उभारण्यास सुरुवात करण्यात आली. २०२३-२४ मध्ये जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

त्यानुसार जिल्ह्यात ८ हजार ४६० कच्चे, वनराई आणि विजय बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट दिले आहे. २०२२-२३ मध्ये फक्त ३ हजार ३३ बंधारे बांधण्यात आले होते. यंदा जिल्ह्यात पावसाने सरासरीदेखील गाठलेली नाही. त्यामुळे प्रशासनस्तरावरून आतापासूनच पाणीटंचाईवर मात करण्याचे नियोजन केले गेले आहे.

या वेळी दसऱ्यापूर्वीच या मोहिमेला गती देण्यात आली आहे. २ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात या मिशन बंधारे लोकचळवळीतून २४९ कच्चे, ६८ वनराई तर १९४ विजय बंधारे उभारण्यात आले होते. आता ही संख्या १२०० च्या पुढे गेली आहे.

यातून प्रशासनाच्या खर्चाची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. स्वतः जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार मोहिमेसाठी तालुकानिहाय दौरे करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department Action: अप्रमाणित निविष्ठांप्रकरणी तीन महिन्यांत ९४ गुन्हे

Farmer Crisis: नाशिक विभागात पाच महिन्यांत ११९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Crop Insurance Scheme: पीकविमा कंपन्यांना ६९४४ कोटींचा नफा

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात वाळव्यातून १२७६ शेतकऱ्यांच्या हरकती

Paddy Sowing: भोरमध्ये भात पेरणीला वेग

SCROLL FOR NEXT