Solar Power  Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Power : भांडूप परिमंडळात सौरऊर्जेला अधिक पसंती

Solar Energy : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या भांडुप परिमंडळात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत तीन हजार ४०० जणांनी अर्ज केले आहेत.

Team Agrowon

Navi Mumbai News : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या भांडुप परिमंडळात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत तीन हजार ४०० जणांनी अर्ज केले आहेत. यातील ६०० ग्राहकांच्या घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्यास सुरुवात झाली आहे.

उर्वरित अर्जदारांच्या छतावर प्रकल्प बसवण्यात येत आहेत. अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत पर्यावरणपूरक वीजनिर्मितीसोबतच आपल्या मासिक वीजबिलात बचत करण्याचे आवाहन भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी केले आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळते. ही योजना फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली. सौरप्रकल्पातून ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य होते. त्यातील शिल्लक वीज महावितरण विकत घेते.

निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रतिकिलोवॅट ३० हजार रुपये अनुदान दोन किलोवॅटपर्यंत मिळते. तीन किलोवॅटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी १८ हजार रुपये अनुदान मिळते. तीन किलोवॅटपेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान ७८ हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे.

गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांकरिता इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगसह सामाईक उपयोगासाठी १८ हजार रुपये प्रतिकिलोवॅट अनुदान मिळते. गृहसंकुलासाठी अनुदानाची एकूण कमाल मर्यादा ५०० किलोवॅट आहे. महावितरणतर्फे रूफटॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांना सोलर नेट मीटर देण्यात येत आहे.

चाचणी जलद

ग्राहक आणि सोलर रूफटॉप बसवणाऱ्या एजन्सींसाठी महावितरणने मीटर चाचणीची प्रक्रिया अतिशय सुलभ आणि जलद केलेली आहे. त्याचप्रमाणे १० किलोवॅटपर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. औष्णिक ऊर्जा प्रकल्पामुळे प्रदूषण होते. त्यामुळे केंद्र सरकारने सौरऊर्जा निर्मितीला प्राधान्य दिले अाहे. सौरऊर्जानिमित्तसाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या अाहेत.

भांडुप परिमंडळातील सोलर बसवलेले ग्राहक

विभाग एकूण प्राप्त अर्ज सोलर बसवलेले सौरनिर्मिती क्षमता (किलोवॅट)

ठाणे शहर ३३८ ५३ १,४९८.९

वाशी १,१०२ १५० ८३४.१

पेण १,९६० ३९७ १,४१५.२५

एकूण ३,४०० ६०० ३,७४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT