Solar Power : पश्चिम विदर्भातील ६ हजार घरांवर सौर ऊर्जानिर्मिती

Suryaghar Yojana : आतापर्यंत पश्चिम विदर्भाच्या पाचही जिल्ह्यांतील ६ हजार २७४ ग्राहकांनी योजनेचा लाभ घेत घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवून स्वत:ची वीज स्वत: तयार करण्यास सुरुवात केली आहे.
Solar Power
Solar PowerAgrowon
Published on
Updated on

Akola News : पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला पश्चिम विदर्भात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत पश्चिम विदर्भाच्या पाचही जिल्ह्यांतील ६ हजार २७४ ग्राहकांनी योजनेचा लाभ घेत घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवून स्वत:ची वीज स्वत: तयार करण्यास सुरुवात केली आहे. पर्यायाने ते विजेबाबत स्वावलंबी झाले आहेत.

या योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. ही योजना फेब्रुवारीमध्ये सुरू झाली. सौर प्रकल्पातून ग्राहकांच्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य होते. शिल्लक वीज महावितरण विकत घेते. निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रतिकिलोवॅट ३० हजार रुपये अनुदान २ किलोवॅटपर्यंत मिळते.

Solar Power
Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

३ किलोवॅटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी १८ हजार रुपये अनुदान मिळते. ३ किलावॅटपेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान ७८ हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे. गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांकरिता इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगसह सामाईक उपयोगासाठी १८ हजार रुपये प्रतिकिलोवॅट अनुदान मिळते. गृहसंकुलासाठी अनुदानाची एकूण कमाल मर्यादा ५०० किलोवॅट आहे.

Solar Power
Solar Project : तीन मेगावॉटचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

महावितरणतर्फे रुफटॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांना सोलर नेट मीटर देण्यात येत आहे. ग्राहक आणि सोलर रूफटॉप बसवणाऱ्या एजन्सीसाठी महावितरणने मीटर चाचणीची प्रक्रिया सुलभ, जलद केली आहे. १० किलोवॅटपर्यंत क्षमतेसाठी स्वयंचलित मंजुरी देण्यात येते. योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते. योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी करून प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट खात्यात जमा केले जाते. ग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे.

जिल्हा लाभार्थी

अमरावती २ हजार ८९४

अकोला १ हजार २०६

बुलडाणा ९९२

यवतमाळ ८२१

वाशीम ३६१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com