Electricity  Agrowon
ॲग्रो विशेष

Veterinary Clinic : मूलचा पशुवैद्यकीय दवाखाना चार महिन्यांपासून अंधारात

Electricity Issue in Veterinary Clinic : मूल येथील पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या गडसुर्ला येथील पशुवैद्यकीय दवाखाना चार महिन्यांपासून अंधारात आहे.

Team Agrowon

Chandrapur News : मूल येथील पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या गडसुर्ला येथील पशुवैद्यकीय दवाखाना चार महिन्यांपासून अंधारात आहे. या दवाखान्याचे आठ हजार रुपयांचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला.

चार महिन्यांपूर्वी मीटर काढले. परिणामी पशुवैद्यकीय दवाखान्यात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.दवाखान्यातील वीजपुरवठा खंडित केला गेल्याने दवाखान्यातील महागडी औषधी ठेवण्यासाठीची शीतकरण यंत्रणा निकामी होण्याच्या मार्गावर आहेत.

काही औषधे या फ्रिजमध्ये ठेवाव्या लागतात. मात्र, दवाखान्यात वीजच नसल्याने औषधे ठेवावे तरी कुठे असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. गडीसुर्ला येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एकमध्ये येतो. या परिसरात गावांची संख्या मोठी आहे.

त्यामुळे पशुपालकांना याचा लाभ व्हावा म्हणून सन २०१७-१८ या वर्षात दवाखान्याला लाखो रुपये खर्च करून जिल्हा परिषदेने नवीन इमारत उभी केली. मात्र या दवाखान्याला नियमित अधिकारी नसून प्रशासनाच्या दुर्लक्षितपणाने विद्युत पुरवठाही खंडित केला गेला.

परिणामी या भागातील जनावरांना शासनाने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप होत आहे. पशू आरोग्याबाबत शासन किती गंभीर आहे, हा मुद्दा देखील या माध्यमातून ऐरणीवर आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बँकेकडून ९४९ कोटींचा कर्जपुरवठा

Orchard Farming : सांगली जिल्ह्यात फळबागेचे क्षेत्र एक लाख एकर

SCROLL FOR NEXT