Monsoon Update Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon : मॉन्सूनची प्रगती शक्य

Rain Update : अंदमान आणि निकोबार बेटांवर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवार (ता. २३)पर्यंत बंगालच्या उपसागर व अरबी समुद्रातून मॉन्सूनला पुढे चाल मिळण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Pune News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) रविवारी (ता. १९) अंदमान निकोबार बेटसमूह आणि मालदीवमध्ये आगमन झाले आहे. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान झाल्याने बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली असून, अंदमान आणि निकोबार बेटांवर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवार (ता. २३)पर्यंत बंगालच्या उपसागर व अरबी समुद्रातून मॉन्सूनला पुढे चाल मिळण्याची शक्यता आहे.

रविवारी (ता. १९) दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सूनने प्रगती केली आहे. तर अरबी समुद्रातून चाल करत मालदीव आणि कोमोरिन भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. यातच बुधवार (ता. २३) पर्यंत मालदीव, कोमोरिन भाग, अंदमान निकोबार बेटांच्या आणखी काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मॉन्सून साधारणत: येत्या २१ पर्यंत अंदमानाची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोहोचतो, तर २२ रोजी अंदमान बेटसमूह व्यापतो. त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो. मॉन्सून रविवारी (ता. १९) अंदमानात दाखल झाला आहे. अंदमानात दाखल झाल्यानंतर अरबी समुद्रात साधारणतः २६ रोजी पोहोचणारा मॉन्सून यंदा १९ रोजी मालदीव बेटे आणि दक्षिण भारत आणि श्रीलंकेलगत असलेल्या कोमोरिन भागात दाखल झाला आहे.

मॉन्सूनचे केरळमधील आगमनही लवकर होत ३१ पर्यंत भारताच्या मुख्य भूमीवर दाखल होण्याची शक्यता आहे. यंदाच्या मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविला आहे. तीव्र पाणीटंचाई आणि उष्णतेच्या झळांनी होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.

कमी दाब क्षेत्राचे संकेत

नैॡत्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आज (ता. २२) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. दोन दिवसांत किनाऱ्यालगत अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. उत्तरेकडे सरकताना तिची तीव्रता वाढत जाण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT