Monsoon Update : खुशखबर ! मॉन्सून ३१ मे पर्यंत केरळात होणार दाखल

Monsoon Update : यंदा मॉन्सून हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडीने जाहीर केला.
monsoon update
mosoon updateagrowon

Monsoon Alert IMD : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) यंदा एक दिवस अगोदर देशाचे प्रवेशद्वार असलेल्या केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. देवभूमी केरळमध्ये ३१ मे रोजी मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

मॉन्सूनचे आगमन चार दिवस मागे-पुढे होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता साधारणत, मॉन्सून १ जून पर्यंत केरळमध्ये पोचतो. यात मॉन्सूनचे आगमन सात दिवस आधी किंवा उशीराने होऊ शकते. गतवर्षी मॉन्सूनचे आगमन आठ दिवस उशिराने म्हणजेच ८ जून रोजी झाले होते. यंदा तो एक दिवस आधीच केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे.

वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीपकल्पावरील पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण, चीनच्या दक्षिण समुद्रातून होणारा किरणोत्सर्ग, आग्नेय हिंद महासागरात खालच्या थरात वाहणारे वारे, वायव्य प्रशांत महासागरातील समुद्र सपाटीलगतचा हवेचा दाब, ईशान्य हिंद महासागरात वरच्या थरात वाहणारे वारे हे सहा घटक हा अंदाज तयार करताना विचारात घेण्यात आले आहेत.

monsoon update
Pre-Mosoon Rain : पूर्वमोसमी पाऊस, वादळी वाऱ्याने नुकसान

यंदा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केला.

मॉन्सून हंगामात 'ला-नीना' स्थिती तयार होण्याचे संकेत असून, इंडियन ओशन डायपोल (आयओडी) धन (पॉझिटीव्ह) राहण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या अखेरीस मॉन्सून हंगामातील पावसाचा सुधारीत दीर्घकालीन अंदाज व विभागानिहाय पावसाचे वितरण स्पष्ट होणार आहे.

मॉन्सूनचे केरळातील आगमन

वर्ष आगमनाचा अंदाज प्रत्यक्ष आगमन

२०१९---६ जून---८ जून

२०२०---५ जून---१ जून

२०२१---३१ मे---३ जून

२०२२---२७ मे---२९ मे

२०२३---४ जून---८ जून

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com