Animal Husbandry Agrowon
ॲग्रो विशेष

Veterinary College Akola: डॉ. रामास्वामी यांनी केली नवीन ‘पशुवैद्यकीय’च्या इमारतीची पाहणी

Animal Husbandry: महाराष्ट्र पशुसंवर्धन आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अकोल्यातील नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सुरू असून, यामुळे पशुसंवर्धन क्षेत्राला नवे बळ मिळणार आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनी केले.

Team Agrowon

Akola News: महाराष्ट्र पशुसंवर्धन आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अकोल्यातील नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सुरू असून, यामुळे  पशुसंवर्धन क्षेत्राला नवे बळ मिळणार आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनी केले.

राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) मार्फत या महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. नुकतीच डॉ. रामास्वामी यांनी बांधकामस्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. या वेळी त्यांनी कामाच्या गुणवत्तेची प्रशंसा करत समाधान व्यक्त केले.

या भेटीदरम्यान, एमएसआयडीसीचे अधीक्षक अभियंता प्रशांत पागृत यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. सचिवांनी प्रत्येक घटकाचा आढावा घेतला व इमारतीच्या डिझाइन, सामग्रीची गुणवत्ता आणि कामाचा वेग यांची माहिती जाणून घेतली.

डॉ. रामास्वामी म्हणाले, ‘‘राज्यातील पशुसंवर्धन क्षेत्राचा सर्वांगीण विकास ही आमची प्राथमिकता आहे. आधुनिक शिक्षण व सुविधा देणाऱ्या या इमारतीमुळे विद्यार्थी, संशोधक व शेतकरी वर्गाला मोठा फायदा होईल. मला अशा दर्जेदार इमारतीची कल्पना होती आणि ती प्रत्यक्षात साकारताना पाहून आनंद वाटतो.’’

हा प्रकल्प एकूण १०५ एकर परिसरात साकारत असून ५०,१७४ चौरस मीटर क्षेत्रफळात विविध शैक्षणिक, निवासी, वैद्यकीय व प्रशासकीय इमारतींचा समावेश आहे. यात प्रशासकीय इमारत, महाविद्यालय इमारत, ग्रंथालय, परीक्षा हॉल, सभागृह आहे.

तसेच  विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे (मुले व मुलींसाठी), अध्यक्षीय निवासस्थान, अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, निवासी डॉक्टर निवास, अतिथिगृह असेल. पशुवैद्यकीय रुग्णालय, क्रीडा हॉल, फार्म हाउस, सांडपाणी प्रक्रिया संयंत्र, पावसाचे पाणी साठवणूक प्रकल्प, प्रवेशद्वार, कंपाउंड वॉल,  पशुपालनासाठी विशेष व्यवस्था म्हणून गुरांचे गोठे असतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Center Closure: आळेफाट्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रे बंद

Agriculture Drone: ड्रोनची उड्डाण वाढू लागली

Sunetra Pawar Chairperson: माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार

Cotton Picking Labour Shortage: कापूस वेचणीसाठी मजूरटंचाई

MPKV Rahuri Convocation: महात्मा फुले कृषी विद्यापीठात उद्या पदवीप्रदान समारंभ

SCROLL FOR NEXT