Quality Education : गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबवा

Rural education : जिल्ह्यात दशसूत्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करण्याचा उपक्रम गेल्या वर्षी सुरू केला. या उपक्रमाला चालना द्यावी. त्यासाठी प्रत्येक पालकांशी संवाद साधणे आवश्यक आहे.
Education Review Meeting
Education Review Meeting Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : शिक्षकांनी आपापल्या विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन, अंक क्षमतांसोबतच निसर्गप्रेम, सुसंस्कार देऊन गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आदींना दिले.

शिक्षण विभागाची जिल्हास्तरीय आढावा बैठक देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात नुकतीच पार पडली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाटकर, जिल्हा शिक्षणाधिकारी (योजना) अरुण शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आदी उपस्थित होते.

Education Review Meeting
Rural Educational Story: मी नव्हे आम्ही : कुंदा बच्छाव

श्री. स्वामी म्हणाले, की जिल्ह्यात दशसूत्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करण्याचा उपक्रम गेल्या वर्षी सुरू केला. या उपक्रमाला चालना द्यावी. त्यासाठी प्रत्येक पालकांशी संवाद साधणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हे तीन घटक सर्वाधिक महत्त्वाचे आहेत. प्रशासन हा या सर्व घटकांना मदत करण्यासाठी सज्ज असायला हवा.

शिक्षकाने आपल्या कर्तव्यात हयगय केल्यास पिढ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शिक्षण हा व्यवसाय नसून ते एक कर्तव्य आहे. आपल्या देशाचे भावी नागरिक घडविण्यासाठी शिक्षकांनी अथक प्रयत्न करावेत,असे आवाहनही त्यांनी केले.

Education Review Meeting
Rural Education: आनंददायी शिक्षणाच्या पाईक

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित म्हणाले, की शिक्षण विभागाच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांबाबत अहवाल द्यावा. शासनाच्या विविध ॲपद्वारे अहवाल द्यावयाचे असतात. त्याबाबत अधिक तत्पर राहावे.

शाळा पाहणी दरम्यान काही विद्यार्थी हे अभ्यासात मागे असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यासाठी विशेष वर्गांचे आयोजन करून त्यांच्या अभ्यासात सुधारणा करून घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. जिल्हा नियोजन अधिकारी वायाळ यांनी विकसित महाराष्ट्र २०४७ सर्व्हेक्षणाबाबत सादरीकरण करून सर्वांना सहभागाचे आवाहन केले. जयश्री चव्हाण यांनी प्रास्ताविक केले, तर अश्विनी लाटकर यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com