Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Modern Technology : आधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पादन खर्च कमी करणारी शेती करावी

Agriculture Production Cost : गुळाणी येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व खेड ईस्ट झोन शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यांतर्गत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Team Agrowon

Pune News : ‘शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. एखाद्या व्यवसायात आपण जसा नफा तोट्याचा जसा विचार करतो, त्या पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करून उत्पादन खर्च कमी करणारी शेती करायला पाहिजे,’’ असे मार्गदर्शन उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाट यांनी गुळाणी (ता. खेड) येथे केले.

गुळाणी येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व खेड ईस्ट झोन शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यांतर्गत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये शेतकऱ्यांना कांदा पिकावरील कीड व रोग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यात शिरसाठ बोलत होते.

या वेळी प्रकल्प उपसंचालक आत्मा श्रीधर काळे, तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील प्रमुख शास्त्रज्ञ दत्तात्रेय गावडे, मंडळ कृषी अधिकारी प्रवीण शिंदे, पाणलोट विकास समिती अध्यक्ष, सचिव व शेतकरी उपस्थित होते. या प्रशिक्षणामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी शिरसाठ यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले.

कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ गावडे यांनी कांदा पिकावरील कीड व रोग या विषयावर मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी वाणी यांनी पंतप्रधान कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.० या योजनेविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Potato Planter Machine: ट्रॅक्टरचलित बटाटा लागवड यंत्र

Vermicompost Briquettes: व्हर्मी कंपोस्ट, डीएपी खताचेही तयार होणार ब्रिकेट

Solar Energy Project: सौर ऊर्जा प्रकल्पाच्या खर्चाची किंमत निश्चित

Farm Loan Waiver Controversy: कृषी कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक

Pulses Processing Subsidy: कडधान्य प्रक्रिया केंद्रासाठी २५ लाखांचे अनुदान

SCROLL FOR NEXT