Pesticide Quality Check: नागपूर जिल्ह्यात कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्या विक्री व गुणवत्ता तपासणीसाठी मोहीम राबवली. यात ११८ नमुने अप्रमाणित आढळले असून यापैकी ७६ प्रकरणात कोर्ट केस, तर १३ प्रकरणात पोलिस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. .जिल्ह्यात ४ हजार १८४ परवानाधारक विक्रेत्यांची संख्या आहे. मोहिमेत १ हजार ९६२ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यात ११८ नमुने अप्रमाणित आढळले. या कारवाईत सर्वाधिक ७९ अप्रमाणित नमुने रासायनिक खतांचे, बियाण्याचे ३३ तर कीटकनाशकांच्या ६ नमुन्याचा समावेश आहे. संबंधित विक्रेत्यांविरुद्ध कृषी विभागाने कारवाई केली. त्यानुसार ७६ प्रकरणांमध्ये कोर्ट केस दाखल आहेत. ४२ प्रकरणांत ताकीद देण्यात आली तर १३ प्रकरणांत पोलिस एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.. Kharif Agriculture Planning: खरिपासाठी बी-बियाणे, खते उपलब्ध करून द्या: आमदार सुहास बाबर .४२ व्यावसायिकांचे परवाने निलंबिततपासणीत दोषी आढळलेल्या परवानाधारक ४२ व्यावसायिकांवर कारवाई करीत त्यांचे ४५ दिवसांसाठी परवाने निलंबित करण्यात आले. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी प्रशासनाने सतर्कता वाढवली असल्याचे कृषी विभागाच्या गुण नियंत्रक विभागाच्या वतीने सांगण्यात आले..Fertilizer Black Marketing: काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा.७१ लाखांचा मुद्देमाल जप्तया कारवाईत १.६० टन बियाणे, १७.३६ टन खत, ३९४ नग कीटनाशक असा ७१ लाखांपेक्षा अधिकचा साठा जप्त करण्यात आला आहे. संबंधित विक्रेत्यांना नोटिस बजावण्यात आली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना केवळ प्रमाणित व अधिकृत विक्रेत्यांकडूनच साहित्य खरेदी करण्याचे आवाहन केले आहे..तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांकजिल्हास्तरावर तक्रार निवारणासाठी ९१८५२१०४७ हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी कोणतीही शंका किंवा तक्रार असल्यास तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.