Orange Agrowon
ॲग्रो विशेष

Modern Orange Center : नागपूर, अमरावती, बुलडाणा येथे होणार आधुनिक संत्रा केंद्रे

Team Agrowon

Pune News : राज्य शासनाने तीन जिल्ह्यांत आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यासाठीच्या योजनेस मान्यता दिली असून, २० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ही केंद्रे नागपूर जिल्ह्यातील काटोल व कळमेश्‍वर, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे होणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली.

श्री. कदम म्हणाले, ‘‘पणन मंडळाने पहिल्या टप्प्यात प्राथमिक प्रक्रिया प्रकल्पाकरिता लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सहकारी प्रक्रिया संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, खासगी उद्योजक आणि बाजार समिती यांचा समावेश आहे.’’

प्राथमिक प्रक्रिया प्रकल्पात पॅक हाऊस, संत्रा ग्रेडिंग लाइन, प्रीकूलिंग, कोल्ड स्टोअरेज आदी सुविधांचा समावेश असून, अंदाजित खर्च ४ कोटी रुपये अपेक्षित आहे. या योजनेअंतर्गत प्रकल्पाकरिता प्रथमत: लाभार्थ्यांनी १५ टक्के स्वनिधी व उर्वरित ८५ टक्के निधी बँकेकडून कर्ज स्वरूपात उपलब्ध करून प्रकल्प उभारणी पूर्ण करणे आवश्यक आहे.

प्रकल्प पूर्णत्वाचा दाखला प्राप्त झाल्यानंतर शासनाकडून प्रकल्पाच्या अंदाजित किमतीच्या ५० टक्के मर्यादेपर्यंत किंवा कमाल २ कोटी रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार असून हे अनुदान लाभार्थ्याच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येईल. या प्रकल्पाकरिता प्रस्ताव मागविण्याकरिताची निविदा तसेच मॉडेल प्रकल्प अहवाल महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या https://www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १ सप्टेंबर २०२४ आहे.

या योजनेचा लाभ संबंधित तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घ्यावा व या योजनेच्या अधिक माहितीकरिता महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या प्रकल्प विभागाशी ०२०-२५५२८१०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT