SRT Technolgy Agrowon
ॲग्रो विशेष

SRT Technique : ‘एसआरटी कृषी रोबोट’ करणार तंत्रज्ञान प्रसार

Paddy SRT Plantation : शून्य मशागत तंत्रातून जमीन सुपीकता, जल, मृद्‌संधारण आणि दर्जेदार पीक उत्पादनासाठी भात पिकासह विविध पिकांच्या लागवडीसाठी एसआरटी तंत्रज्ञान उपयुक्त ठरले आहे.

Team Agrowon

Pune News : शून्य मशागत तंत्रातून जमीन सुपीकता, जल, मृद्‌संधारण आणि दर्जेदार पीक उत्पादनासाठी भात पिकासह विविध पिकांच्या लागवडीसाठी एसआरटी तंत्रज्ञान उपयुक्त ठरले आहे. या तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी आता आधुनिक माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे.

याबाबत सगुणा रूरल फाउंडेशनचे संस्थापक संचालक कृषिरत्न चंद्रशेखर भडसावळे म्हणाले, ‘‘‘एसआरटी कृषी रोबोट’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना एसआरटी पद्धतीने पीक लागवड तंत्र आणि व्यवस्थापनाची सर्वांगीण माहिती मोबाइवरून त्वरित उपलब्ध करून देण्यात येईल.

शेतकऱ्यांना एसआरटी तंत्राबाबत असलेल्या प्रश्‍नांची अचूक उत्तरे लगेच मिळतील. ही माहिती सेवा शेतकऱ्यांसाठी मोफत व २४ तास मिळेल. कृषी रोबोट सेवेचा प्रारंभ गुरुवारी (ता. ८) संध्याकाळी ६ वाजता होणाऱ्या वेबिनारमधून होईल. शुक्रवारपासून (ता. ९) हे तंत्रज्ञान सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध होईल.

...असे आहे तंत्रज्ञान :

१) व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या प्रगत क्षमतांचा वापर करून, शेतकऱ्यांना एसआरटी कृषी तंत्रज्ञानाबद्दल त्यांच्या प्रश्‍नांची त्वरित उत्तरे देण्यास हे माध्यम अत्यंत प्रभावी.

२) एसआरटी तंत्रज्ञानाच्या विविध पैलूंबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध, यामध्ये पीक व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, पिकांच्या वाढीच्या टप्यातील शास्त्रीय माहिती, व्हिडिओ उपलब्ध.

३) व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी रोबोट वापरण्यास अतिशय सोपे आहे. तंत्रज्ञान २४ तास उपलब्ध.

एसआरटी कृषी रोबोट वापरण्याची पद्धत :

१) शेतकऱ्यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅपवर एसआरटी कार्यालयाचा संपर्क क्रमांक (+९१९६७३०२७९७५) नोंदवावा. या क्रमांकावर “SRT किंवा नमस्कार” असा संदेश पाठवला, की माहिती मिळण्यास सुरुवात होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming : नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांसाठी १० लाख कोटी रुपयांची बाजारपेठ खुली होईल; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

Solapur Assembly Election : सोलापुरात चुरशीने मतदान, माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोटला रांगा

Forest Fire : वणव्यांमुळे जैवविविधता धोक्‍यात

Winter Update : नाशिकचा पारा १०.९ अंशांवर

Rabi Season 2024 : यंदाच्या रब्बीतही हरभराच हुकमी पीक

SCROLL FOR NEXT