Vijay Wadettiwar  Agrowon
ॲग्रो विशेष

Vijay Wadettiwar : मर्जीतल्या कंपनीकडून मोबाइल खरेदीचा घाट : वडेट्टीवार

Mobile phone purchase scam: अंगणवाडी सेविकांना महिला व बालविकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या मोबाइलसाठी मर्जीतल्या कंपनीकडून १५५ कोटी रुपयांचे मोबाइल फोन खरेदीचा घाट घातल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी (ता. ६) केला.

Team Agrowon

Mumbai News : महायुती सरकारची भूक दिवसेंदिवस वाढत असून, सत्तेसाठी पैसा आणि पैशातून सत्ता हे या सरकारचे ब्रीद आहे. राज्यात आठ हजार कोटींचा ॲम्बुलन्स घोटाळा गाजत असतानाच अंगणवाडी सेविकांना महिला व बालविकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या मोबाइलसाठी मर्जीतल्या कंपनीकडून १५५ कोटी रुपयांचे मोबाइल फोन खरेदीचा घाट घातल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी (ता. ६) केला.

तसेच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना सरकार साड्या वाटणार आहे. या योजनेत १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला. वडेट्टीवार म्हणाले, की राज्य सरकारमध्ये दोन अलिबाबा आणि ८० चोर आहेत. त्यांच्यात पैसे खाण्याची स्पर्धा सुरू आहे.

लोकसभा आचारसंहिते अगोदर सरकारी तिजोरी लुटून खाण्याचा सरकारचा इरादा आता लपून राहिला नाही. पैसे खाण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाइल देण्याची शक्कल सरकारने लढवली आहे. मोबाइल द्यायचा असेल तर अंगणवाडी सेविकांच्या खात्यात थेट पैसे जमा करावेत.

त्यांना हवा तो मोबाइल घेण्याची मुभा द्यावी. महिला बाल विकास विभाग १५५ कोटी रुपये मोबाइलवर खर्च करणार आहे. हा घोटाळा सरकारने वेळीच थांबवावा. ज्या कंपनीकडून मोबाइलची खरेदी केली जाणार आहे, ती दिल्लीतील कंपनी कोणाच्या जवळची आहे याची चौकशी करावी. अंगणवाडी सेविकांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावावेत, ॲम्बुलन्स, मोबाइल घोटाळ्यानंतर आता सरकारने साडी घोटाळा केला आहे.

अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला महायुती सरकार एक साडी देणार आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार मत मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. राज्यातील महिला असुरक्षित आहेत. राज्यातली तरुणी, महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. गावगुंडांचा, नराधमांचा, रोडरोमिओंचा त्रास सुरूच आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT