Vijay Wadettiwar : शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणे हाच महायुतीचा पॅटर्न

Maharashtra Drought : राज्यात गेल्या अडीच महिन्यांमध्ये अत्यंत कमी पाऊस पडला आहे. हीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात दुष्काळाचे मोठे संकट महाराष्ट्रावर येऊ शकते ही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात गेल्या अडीच महिन्यांमध्ये अत्यंत कमी पाऊस पडला आहे. हीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात दुष्काळाचे मोठे संकट महाराष्ट्रावर येऊ शकते ही शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यात १ जानेवारी ते ३१ जुलैपर्यंत तब्बल १ हजार ५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Vijay Wadettiwar
Farmer Death : मराठवाड्यात आठ महिन्यांत ६८५ शेतकरी आत्महत्या

राज्यात शेतकरी आत्महत्या करून आपले जीवन संपवत आहेत. केवळ आश्वासने देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून मोकळे व्हायचे हाच महायुती सरकारचा पॅटर्न असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ‘ॲग्रोवन’मध्ये गेल्या सहा महिन्यांतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी ट्विट करून सरकारला लक्ष करत जोरदार टीका केली.

Vijay Wadettiwar
Farmer Death : शेतकरी आत्महत्यांचा आलेख चढताच ; ६ महिन्यांत साडेपंधराशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या

‘दुष्काळी संकट आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचा अहवाल पुढे आला आहे. यानुसार राज्यात १ जानेवारी ते ३१ जुलैपर्यंत तब्बल १ हजार ५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यात अमरावती विभागात सगळ्यात जास्त ६३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. जानेवारीत २२६, फेब्रुवारी १९२, मार्च २२६, एप्रिल २२५, मे २२४, जून २३३, जुलैमध्ये २२९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचे या अहवालातील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

वडेट्टीवार म्हणाले, की राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. राज्यात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या जून महिन्यात झाल्या आहेत. जानेवारी ते जुलैपर्यंत १५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र राज्यातील महायुतीचे ट्रिपल इंजिन सरकार आपल्याला काय त्याचे? म्हणत आपल्याला फक्त आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून मोकळे व्हायचे आहे, हाच पॅटर्न सरकार चालवताना महायुतीने हाती घेतला आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com