Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : विमा कंपनीच्या कार्यालय फलक, शटरला फासले काळे

Advance Crop Insurance : यावर्षी लातूर जिल्ह्यात अतिशय कमी पाऊस झाला आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे तसेच पिकांच्या वाढीच्या व फुले लागण्याच्या कालावधीमध्ये तापमान ३० से ते ३२ से पेक्षा जास्त राहिल्यामुळे अनेक ठिकाणची पिके वाळून फुलगळ झाली.

Team Agrowon

Latur News : जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम पीकविमा जमा करावा यासाठी मनसे सरचिटणीस तथा मनसे शेतकरी सेना अध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत गुरुवारी (ता. २) पीकविमा कार्यालयाच्या फलकास काळे फसण्यात आले.

यावर्षी लातूर जिल्ह्यात अतिशय कमी पाऊस झाला आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे तसेच पिकांच्या वाढीच्या व फुले लागण्याच्या कालावधीमध्ये तापमान ३० से ते ३२ से पेक्षा जास्त राहिल्यामुळे अनेक ठिकाणची पिके वाळून फुलगळ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळामध्ये सोयाबीन पिकाच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा घट येणार अशी स्थिती निर्माण झाली. संयुक्तपणे सर्वेक्षण केल्यानंतर त्याचा अहवाल ३१ ऑगस्ट २०२३ रोजी प्राप्त झाला.

या अहवालानुसार हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात ६० ते ७० टक्के घट होण्याची शक्‍यता जिल्ह्यातील साठही महसूल मंडळामध्ये दर्शविली गेली. त्यामुळे या अहवालानुसार जिल्हाधिकारी लातूर यांनी १ सप्टेंबर रोजी २५ टक्के अग्रिम पीकविमा देण्यासंदर्भात अधिसूचना काढली. अधिसूचना जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत २५ टक्के अग्रिम पीकविमा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला हवा होता.

परंतु दोन महिने होऊ नये विमा कंपनी शेतकऱ्यांना विमा द्यायला तयार नाही. पीकविमा कंपनी सध्या अपिलांवर अपील करून शेतकऱ्यांना विमा देण्याचे टाळत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. ६ सप्टेंबर २०२३ रोजी एसबीआय जनरल पीकविमा कंपनीने लातूर जिल्ह्यातील फक्त दहा महसूल मंडळांमध्ये २१ दिवसांचा पावसाचा खंड होता. त्यामुळे फक्त दहाच महसूल मंडळांत २५ टक्‍के अग्रिम पीकविमा दिला जाऊ शकतो.

बाकीच्या मंडळांना अग्रिम पीकविमा लागू होत नाही अशी भूमिका अगोदर पीकविमा कंपनीने घेतली होती. परंतु आता मनसे शेतकरी संघटना व प्रशासनाच्या कडक भूमिकेनंतर जिल्ह्यातील ३२ महसूल मंडळांत विमा द्यायला तयार आहेत.

त्यामुळे विमा कंपनीने अपिलावर अपील न करता तत्काळ साठही महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत या मागणीसाठी मनसेच्या वतीने एसबीआय जनरल कंपनीच्या जिल्हा कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी सह निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने, संजय राठोड, शिवकुमार नागराळे, रेखाताई नागराळे, यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fardad Kapus: फरदड कापसाचे पीक का घेऊ नये?

Fish Rate: बाजारात ताज्या मासळीचे दर तिप्पट

Sugarcane Bill: निळकंठेश्वर कारखान्यातर्फे चोवीस कोटी ३५ लाखांचे ऊसबिले अदा

PA Retirement Farewell:...अन् जिल्हाधिकारी झाले बॉडीगार्ड !

Sand Mining: नदीपात्रात वाहने उतरविल्याने वाळू उपशाला स्थगिती

SCROLL FOR NEXT