Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Mhaisal Irrigation Scheme : मंगळवेढ्याला म्हैसाळचे पाणी द्या

Water Crisis : मंगळवेढा तालुक्यातील गावांना म्हैसाळचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळत नाही, सांगोला तालुक्याला ०.८५ टीएमसी पाण्याची तरतूद आहे,

Team Agrowon

Solapur News : जत (जि. सांगली) तालुक्यात म्हैसाळचा कालवा फोडला जात असल्याने मंगळवेढ्यातील १९ गावांना म्हैसाळचे पाणी मिळत नसल्याची कैफियत पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडली. जत तालुक्यात जमावबंदीचा आदेश लावा आणि मंगळवेढ्याला हक्काचे पाणी द्या, अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी दिल्या.

मंगळवेढा तालुक्यातील गावांना म्हैसाळचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळत नाही, सांगोला तालुक्याला ०.८५ टीएमसी पाण्याची तरतूद आहे, त्यांना पाणी मिळते परंतु आम्हाला मिळत नाही, आम्हालाही म्हैसाळचे पाणी मिळावे, अशी मागणी आमदार आवताडे यांनी केली.

त्यांच्या या मागणीवर म्हैसाळचे कार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी उत्तर द्यावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. कार्यकारी अभियंता पवार म्हणाले, चार आवर्तनासाठी मंगळवेढ्यातील १९ गावांमधील ६ हजार हेक्टरसाठी १.२७ टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे. प्रत्यक्षात मंगळवेढ्याला ०.२५ टीमएसी एवढेच पाणी दिले आहे.

पाणी नियोजनात गफलत, बुधवारी होणार बैठक

आमदार राजू खरे, आमदार अभिजित पाटील यांनी सीना नदीत पाणी सोडण्याची मागणी केली. पाण्यासाठी लोक उपोषणाला बसले आहेत, तुम्ही जिल्ह्याचे पालक आहात, पाणी सोडा, अशी मागणी आमदार खरे यांनी केली.

कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री आहेत. त्यांनी उजनीच्या पाण्याचे नियोजन केले आहे. यंदा उजनीच्या नियोजनात गफलत झाल्याने अडचणी येऊ लागल्या असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले. जिल्ह्यातील पाणी प्रश्‍नासोबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत ता. २१ बैठक होणार असल्याचे गोरे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: आले दरात सुधारणा; जिऱ्याचे भाव टिकून, कांद्यात काहीसे चढ उतार, गव्हाचे दर स्थिर, पपईची आवक कमीच

Agriculture Scheme: नांगर, रोटाव्हेटरसह १२ अवजारांसाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान; यांत्रिकीकरणाला सरकारकडून प्रोत्साहन

Brinjal Farming: दर्जेदार उत्पादनासाठी नियोजनबद्ध व्यवस्थापन

Soil Health: सांगलीतील जमिनीत सेंद्रिय कर्ब, नत्र यांची कमतरता

Agriculture Technology: भाजीपाला सुकविण्यासाठी यंत्रणा

SCROLL FOR NEXT